Apmc News Breaking:गिरीश महाजनवर तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया

25
0
Share:

मुंबई- सांगली आणि कोल्हापूर मधिल पुराची भीषण स्थिती पाहण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी गिरीश महाजन यांनी सेल्फी काढून नागरिकांची थट्टा केली आहे.”निर्लज्जम सदासुखी” आणि ” निर्लज्जपणाचा कळस” म्हणूनच गिरीश महाजन यांचा येथे उल्लेख करता येईल. याला सांगलीकर,कोल्हापूरकर कधीच माफ करणार नाहीत.मुख्यमंत्री साहेब योग्य वेळ आल्यावर राष्ट्रीय आपत्ती म्हणुन जाहीर करू, असे आपण म्हणालात. आपली जनादेशयात्रा झाली, काहीजणांची जनआशीर्वाद यात्रा झाली ,काहीजणांची शिवस्वराज्य यात्रा झाली पण इथे जनता ” मरण यात्रेत” आहे त्यांना पहिले सुरक्षितपणे बाहेर काढणे गरजेचे त्यासाठी राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा .तुम्ही आणि चंद्रकांत दादा पाटील म्हणता की” आपकी बार 220 पार “परंतु आता आपल्या कार्यकर्त्यांना सांगा ना की “अबकी बार पूरग्रस्त नागरिक सुरक्षित पार “म्हणून सगळ्यांना मदतीला तिथे उतरण्याचे आदेश द्या इतका असंवेदनशीलपणा दाखवू नका आणि पूरग्रस्त ठिकाणाची पाहणी करताना सरकारने कृपया चेष्टा करू नये हीच विनंती भुमाता ब्रिगेडचा संस्थापक अध्यक्ष तृप्ती देेशाई याांनी केेली आहे

Share: