BREAKING NEWS # मुंबई एपीएमसी दाना मार्केट मध्ये काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण.

7
0
Share:

ठळक मुद्दे

-बाजारसमितीचे वरिष्ठ अभियंता व उप अभियंताच्या आशीर्वादामुळे कंत्राटदाराची भोंगळ कारभार.

-मुंबई एपीएमसी दाना मार्केट मध्ये काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण.

-व्यापार भवन समोर असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्ते बुजवून कंत्राटदारानी टाकले डांबर.

-आशिया खंडातील मोठ्या बाजारपेठ असलेल्या दाणा मार्केट मध्ये घडल्या हे प्रकार.

नवी मुंबई:मुंबई एपीएमसी दाना मार्केट व्यापार भवन समोर 4 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर सध्या डांबरीकरणच्या काम सुरू आहे । व्यापार भवन व J विंग मध्ये असलेल्या काही शिलक सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आली आहे या मध्ये अशे दिसुन येत आहे की टेंडर मध्ये दाखवले जाते एक आणि प्रत्यक्षात मात्र वेगळेच काम केले जाते टेंडर मध्ये आणि प्रत्यक्ष कामामध्ये फार मोठी तफावत जाणवत आहे । मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दाना मार्केट व मसाला मार्केट मध्ये काँक्रीट, डांबरीकरण व गटारांची कामा साठी 19 कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आला आहे, दाना मार्केट आणि मसाला मार्केट मध्ये व्यापारी,माथाडी कामगार व ट्रान्सपोर्टला मूलभूत सुविधा देण्यासाठी बाजार समितीतर्फे रस्त्याचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण व गटारांची काम सुरू आहे. परंतु व्यापार भवनच्या समोर असलेल्या सिमेंट काँक्रीतिच्या रस्त्यावर डांबर टाकण्यात आली आहे , एका मार्केट मध्ये असे प्रकार घडली आहे अजून कित्तीबकाम बाकी आहे । व्यापाऱ्यानी सांगितले प्रमाणे दोन्ही मार्केट मध्ये बारा महिने झाले तरी सुद्धा 30 टक्के काम पूर्ण झाली नाही या मध्ये असे दिसून येत आहे कि या रस्त्यावर होणारा खर्च हा उघड उघड भ्रष्टाचार आहे. हे काम फक्त भ्रष्टाचारासाठी केले जात आहे या गोष्टी मध्ये बाजार समिती प्रशासन काय निर्णय घेणार सगळेच्या लक्षय आहे।

आशिया खंडातील मोठ्या बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पांच मार्केट आहे या मध्ये मसाला मार्केट व दाना मार्केट आहे .मार्केट मध्ये काही वर्षांपासून रस्ते ,गटर आणि विविध प्रकारच्या समस्यावर व्यापाऱ्या कडून बाजार समितीला तक्रार केला जात होता त्यामुळे बाजार समितीतर्फे दोघे मार्केटची काँक्रीटीकरण, डांबर व गटारांची काम करण्यासाठी टेंडर काढण्यात आली पण दोन्ही मार्केटची टेंडर एका कंत्राटदार B.J civil work ला मिळाली. सूत्राने सांगितले प्रमाणे काम करणाऱ्या कंत्राटदार B.J.civil work बाजार समितीच्या वरिष्ठ अभियंत्याच्या जवळील असल्यामुळे त्याला हे काम देण्यात आली. काम सुरू होउन बारा महिन्या झाली मात्र ती पण चार ते पाच विंग मध्ये काम झालेली आहेत मुख्य काम अजूनही बाकी आहे काँक्रीट रोडमध्ये अद्यापही कांम चालू झालेले नाही ह्या कामाला जेवढा उशीर होईल तेवढिच त्या कामाची किंमत वाढेल त्यामुळे या मधून असे दिसून येत आहे की घेतलेल्या कंत्राटदारांच्या कामाच्या किंमतीमध्ये वाढ होण्यासाठीच ह्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही ?

व्यापाऱ्यांच्या समस्या तसेच गटारांची कामे झालेली नाही डांबरीकरणाचे काम हे टेंडर मध्ये दाखवले जाते एक आणि प्रत्यक्षात मात्र वेगळेच काम केले जाते टेंडर मध्ये आणि प्रत्यक्ष कामामध्ये फार मोठी तफावत जाणवत आहे डांबरीकरणाच्या कामामध्ये बिटूमिन कन्टेन्ट कमी वापरल्यामुळे रस्त्यांची कॉलिटी तसेच चांगली कामे होणार नाही कालांतराने या रस्त्यावर खड्डे पडणार वाहतुकीनची वर्दळ असल्यामुळे हे काम लवकरच खराब होऊन ह्या वर जागजागि खड्डे पडणार मग तोच कंत्राटदार हे खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा एकदा पैशांचा वापर करणार अशी काही व्यापरियानी सांगितले आहे।

दाना मार्केट,मसाला मार्केट बनला डेब्रिज टाकण्याची ठिकाण
बाजार समितीने दानामार्केट व मसाला मार्केट मध्ये रस्त्यावर डेब्रिज टाकण्यासाठी ठिकाण तयार केला आहे ते कुठे नाही तुम्ही गेटला आत गेला की तुम्हला पूर्ण डेब्रिज दिसणार त्यामध्ये हे खरीप/ डेबिज टाकले जाते हे प्रत्यक्षात दिसून येत आहे यामध्ये नवी मुंबई मनपाचे डेब्रिज पथक,बाजार समितीचे वरिष्ठ अभियंता तसेच शासकीय पथकाच्या मताने बाजारसमित्यांमध्ये हे खरीप/डेबिज टाकले जात आहे हे टाकुन सहा महिने झाले तरी सुद्धा यासबंधीत बाजार समितीचे उप अभियंतला तक्रार करून सुद्धा ते काही करत नाही अशी प्रतिक्रिया काही ब्यापारी यांनी दिली आहे,कायद्यानुसार मार्केटमध्ये असलेले हे डेबिज खोदकाम संपले की लगेच बाहेर टाकले जात मात्र वरिष्ठ अभियंताच्या आशीर्वादामुळे कंत्राटदार सहा महिन्यां पासून बाजार आवारात डेब्रिज टाकतात यावर व्यापाऱ्यांनी तक्रारी करून सुद्धा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही उलट व्यापार्यांनाच धमकी दिली जाते दोन्ही कडे टाकलेले डेबिज हे एक दोन ट्रक नाही कमीतकमी 400 ट्रक आहे ।ज्यामुळे व्यापाऱ्यांना,माथाडी कामगारांना तसेच ट्रान्सपोर्ट करणाऱ्यांना श्वास घेणाऱ्या त्रास होत असून काही व्यापारी आणि कामगारांना दमाच्या रुग्णांना त्रास हाऊ लागली आहे । काही व्यापाऱ्यांनी सांगितले की आम्ही एपीएमसी प्रशासनाला याबद्दल तक्रारी करून सुद्धा एपीएमसी प्रशासन यावर कोणतीही ठोस पावले उचलत नाही आम्ही वारंवार सांगून सुद्धा आमच्याकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करत आहे काही व्यापाऱ्यांनी असे सांगितले की पाऊसामध्ये पाणी साचले जाते त्यामुळे आम्हाला शारीरिक त्रास सुद्धा सहन करावा लागला। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला कोट्यवधी रुपये व्यापारी शेष देतात त्या बदल बाजार समिती आम्हाला काही सोयीसुविधा देत नाही अशे प्रतिक्रिया व्यापाऱ्यानी दिली ।

Share: