मुख्यमंत्री रविवारी रायगड जिल्ह्यात,आपदग्रस्तांना मदतीचे वाटप

4
0
Share:

*मुख्यमंत्री रविवारी रायगड जिल्ह्यात*
*आपदग्रस्तांना मदतीचे वाटप*

मुंबई दि 13: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या रविवारी 14 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असून चौल, बोर्ली, मुरुड येथे चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप केले जाणार आहे .सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री मांडवा जेट्टी येथे पोहचतील. त्यानंतर चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतील. 11 वाजता चौल मधील घरे, पिके नुकसानीची पाहणी करून नंतर त्यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान, सौर कंदील, इतर साहित्याचे वाटप करण्यात येईल. दुपारी 12 वाजता त्यांचे बोर्ली येथे आणि 12.30 वाजता मुरुड येथे आगमन होईल. दोन्ही ठिकाणी नुकसानीची पाहणी आणि मदत वाटप करण्यात येईल. मुरुड येथे त्यांची पत्रकार परिषद देखील होईल
दुपारी 3 वाजता मांडवा जेट्टी येथून बोटीने ते मुंबईकडे रवाना होतील.

Share: