मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तहसीलदारांना खुर्चीत बसविले अन त्यांच्या सोबत फोटो काढला,तहसीलदारांनि सांगितले हा अविस्मरणीय क्षण आहे

5
0
Share:

-मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा विनम्रपणा हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

सांगली – मुख्यमंत्र्यानी तहसीलदारांना खुर्चीत बसविले अन त्यांच्या सोबत फोटो काढला. तहसीलदारांना म्हणाले हा अविस्मरणीय क्षण आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनम्रतेचे दर्शन सर्वत्र एकच चर्चा झााली आहे

17 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली दौऱ्यावर आले होते यावेळी इस्लामपूर येथील तहसिलदार कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनम्रतेचे दर्शन पाहायला मिळाले, प्रोटोकॉल बाजूला ठेवुन त्यांनी एका तालुका तहसीलदाराला खुर्चीत बसविले आणि स्वता उभे राहिले अन छानसा फोटो काढून दिला मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा विनम्रपणा हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. सरकारी यंत्रणेत प्रोटोकॉल चा नको तो बागुलबुआ उभा केला जातो. वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्री  दौऱ्यावर आले की आपली खुर्ची ध्यावी लागते आणि मान खाली घालून  तहसीलदारांना कित्येक वेळा मान खाली घालून उभं राहावे लागते.  या प्रोटोकॉल पाळताना बिचारा अधिकारी घायकुती ला येतो. दौऱ्याच्या सगळी सरबराई करायची आणि निवासाची आणि सर्व व्यवस्था  करण्यात  तहसीलदार व्यस्त असतात आणि या गडबडीत वरिष्ठांन कडून कौतुकाचे शब्द ऐकायला मिळने  हे दुरापास्त असते. तहसीलदारांच्या ऑफिसच्या ( कक्षाच्या)  दिशेने जात असताना  तेंव्हाच मुख्यमंत्र्याणी जाहिर केले की नवीन तहसीलदारांना त्यांच्या खुर्चीवर स्थानापन्न करूनच या नवीन केबिनच उदघाटन करणार आहे. आणि मुख्यमंत्री तहसीलदार कक्षात आल्या नंतर उदघाटक म्हणनून सर्वानी आग्रह केला की पहिला मुख्यमंत्री तुम्ही या खुर्ची वर बसावे आणि या खुर्चीचा बहुमान वाढवावा. सर्वांच्या विनंति ला मान दिला आणि मुख्यमंत्री हे या खुर्ची वर बसले ही.  मात्र काही क्षणच बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुर्ची वरून उठून तहसीलदार रवींद्र सबणीस यांना खुर्चीवर बसवले.छोट्याश्या तालुक्याच्या एका तहसीलदारांना राज्याच्या मुख्यमंत्रयांचा आदेश ऐकावा लावला आणि मुख्यमंत्र्यां नी वाळवाचे तहसीलदार रवींद्र सबणीस यांना आग्रह करत प्रेमळ सूचना वजा आदेश दिला आणि खुर्चीवर बसवले. स्वतः उभं राहून तहसीलदारांना खुर्चीवर बसवून त्यांच्या सोबत फोटो काढला.

यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनम्रतेचे दर्शन दिसुन आले असून प्रोटोकॉल बाजूला ठेवुन त्यांनी एका अधिकाऱ्याचा कसा सन्मान कारायचा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कृती तुन दाखवुन दिले आहे. या घटने नंतर वाळवा चे तहसीलदार रवींद्र हसबणीस यांनी  सांगितले की हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे.

 

Share: