गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट !

Share:

भंडारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोसीखुर्द धरनाची पाहणी केली आहे राज्यातील सर्व धरणाची पाहणी करून ती कशी लवकरात लवकर करता येतील हि आमची मुख्य भूमिका आहे असे मुख्य मंत्र्यांनी सांगितले तर काही धरणाची कामे अजून अर्धवट आहेत काही ठिकाणी कॅनल ची कामे पूर्ण झालेली नाहीत.
राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या आढाव्याची सुरुवात आपण विदर्भापासून केली असून, गोसेखुर्द हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही देतानाच प्रकल्प पूर्ण करतानाच त्यामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे योग्य पुनर्वसन व्हावे तसेच पुनर्वसन पूर्ण झाल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी रोजगारनिर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याला प्राधान्य द्यावे, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.

शेतकऱ्यांनी अडवला मुख्यमंत्र्यांचा ताफा

गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी करून चंद्रपूरला जात असताना शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवला. विदर्भातील रखडलेले सिंचन प्रकल्प निधी देत मार्गी लावावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी गाडीच्या बाहेर येऊन संवाद साधत काम पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले.

Share: