धारावी व चेंबूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू,मुंबईत एकाच दिवसात कोरनाचे 7 बळी

5
0
Share:

मुंबई : धारावीतील 56 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा  आज रात्री कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णाला 23 मार्चपासून सतत ताप येत होता. त्यामुळे 26 मार्च रोजी या रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाच्या रक्त तपासणीत त्याला कोरोनाची लागण झाल्याचं आज समोर आलं. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान या रुग्णाचा आज रात्री मृत्यू झाला .

दरम्यान, मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या सात नातेवाईकांनाही क्वारंटाईन करण्यात आलं आहे. याशिवाय रुग्ण राहत असलेल्या इमारतीलाही सील करण्यात आलं आहे. धारावीतील कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 17 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे आज राज्यात 7 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 6 जण मुंबईचे आहेत. मुंबईत आज दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 340 वर पोहोचला आहे. आज (1 एप्रिल) दिवसभरात 33 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात 30 रुग्ण हे मुंबईतील असून दोन पुण्यातील आणि एक बुलडाण्यातील रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 340 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 181
पुणे – 38
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर – 16
कल्याण – 10
नवी मुंबई – 13
अहमदनगर – 8
ठाणे – 8
वसई विरार – 6
यवतमाळ – 4
बुलडाणा – 4
पनवेल – 2
सातारा – 2
कोल्हापूर – 2
पालघर- 1
उल्हासनगर – 1
गोंदिया – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
जळगाव- 1
नाशिक – 1
इतर राज्य (गुजरात) – 1

एकूण 340

राज्यात आज एकूण 705 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 हजार 465 नमुन्यांपैकी 322 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर आतापर्यंत 41 कोरोना बााधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच राज्यात 24 हजार 818 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 1 हजार 828 जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल

मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल

Share: