नवी मुंबई शहरात कोरोना लसीकरण मोहिम ,प्रायोगिक तत्वावर 25 जणांना देण्यात आली लस

8
0
Share:

नवी मुंबई मध्ये आज कोरोना लसीची ड्राय रन करण्यात आले. नेरूळ येथील महानगर पालीका रूग्णालयात करण्यात आलेल्या ड्राय रन मध्ये सर्वसामान्य नागरिकांना कोरोना लसीबाबत माहिती देण्यात आली. लस घेण्या आधीची खबरदारी, लय दिल्यानंतर घेण्यात येणारी काळजी याची माहिती आज महानगर पालीका डाॅक्टरांकडून देण्यात येत होती. नवी मुंबई शहरातील नागरिकांना त्वरीत लस देण्यासाठी शहरात ५० च्या वर कोरोना लस सेंटर उभ्या करणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे. दिवसाला ५ हजार शहर वाशीयांना लस देण्याचे नियोजन महानगर पालीका प्रशासनाने केले आहे.

कोरोना लसीसाठी घेण्यात येणाऱ्या या ड्राय रनमध्ये कोविड 19 रोलआऊटच्या सर्व पैलू उदाहरणार्थ राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि रुग्णालय स्तरांवरील अधिकाऱ्यांची ओळख पटवून दिली जाईल. कोविड 19चे लसीकरण सुरु करण्यासाठी वॉक-इन-फ्रीजर, वॉक-इन-कूलर, आइस-लाइंड रेफ्रिजरेटर, डीप फ्रीजरसोबतच सिरिंज आणि इतर संसाधनांच्या पुरेशा साठ्याबाबचीही निश्चिती करण्यात येईल. त्यानंतर केंद्र सरकारने ड्राय रन देशभर राबविण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा केंद्र सरकार संपूर्ण देशात ड्राय रन केलं आहे.

Share: