केशर आंब्याचे महाकेशर नावाने ब्रॅण्डींग करण्यासाठी शेतकऱ्यांनी केली स्थापन!

Share:

औरंगाबाद : गुजरातमधून मराठवाड्यात आलेल्या केसर आंब्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही दबदबा निर्माण केला आहे. सुरुवातीला घनलागवड पद्धतीने लागवड होणारा केशर आता अति घनलागवडीतून चाैपट उत्पन्न देणारा ठरत आहे.
हापूस प्रमाणे इथल्या केशर आंब्याचे महाकेशर नावाने ब्रॅण्डींग करण्यासाठी शेतकरी एकवटले असून राज्याचा महाकेशर आंबा बागायतदार संघ स्थापना करण्यात आला आहे. अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुशिल बलदवा यांनी दिली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत महाकेशर आंबा बागायतदार संघ स्थापनेची उद्दिष्टे संचालक मंडळाने स्पष्ठ केली. यावेळी उपाध्यक्ष व तज्ज्ञ संचालक डाॅ. भगवान कापसे, सचिव पंडित लोणारे, दुधसंघाचे उपाध्यक्ष व संघाचे सदस्य नंदलाल काळे, खजिनदार शिवाजी उगले, अशोक सूर्यवंशी, रसुल शेख, विकास कापसे आदींची उपस्थिती होती. संघात मराठवाड्यासह नगर, नाशिक, सोलापूर, सांगलीसह राज्यातील चारशेवर सदस्य झाले असून सदस्य नोंदणी सुरु करण्यात आहे. कोकण वगळता कार्यकारणीत सर्व विभागाचे प्रतिनिधी असल्याचेही अध्यक्ष बलदवा म्हणाले. डाॅ. कापसे म्हणाले, मराठवाड्यात सध्या १५ हजार हेक्टरवर फळबाग लागवड आहे. आपल्याकडील लहान आकाराच्या केशरला तंत्रज्ञानाची जोड देवून अडिचशे ग्रॅमपर्यंत वाढवणे. केशरचे महाकेशर असे ब्रॅण्डींग करुन उत्पादक ते विक्रेता आणि निर्यात अशा साखळीच्या निर्मितीसाठी तयारी, मार्गदर्शन करणे, आंबा लागवड ते संवर्धनासाठी लागणारे योग्य इनपुट एका छताखाली उपलब्ध करणे, त्याच्या वापराची शास्त्रोक्त माहिती, प्रक्रिया, पुरक उत्पादने, साठवण, संरक्षण, व्यवस्थापनाच्या आवश्यक सोयी उपलब्धतेसाठी संघ प्रयत्न करेल.
तसेच द्राक्ष बागायतदार संघाच्या मार्गदर्शनात केशर आंबा उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचे काम भविष्यात केले जाईल. व्हाॅट्सॲपच्या ग्रुपच्या माध्यमातून व लाॅकडाऊन काळातील झालेल्या ९ वेबिणार मधून केशरचे महाकेशर नावाने ब्रॅण्डींगचा विचार समोर आला. त्यातून या आंबा बागायतदार संघाची स्थापना झाली. आंबा लागवडीची गणना, आंबा महोत्सव आदी उपक्रमही राबवल्या जाणार जाणार असल्याचे डाॅ. कापसे यांनी सांंगितले.

Share: