मुंबई Apmc फळ मार्केटमध्ये फळांच्या दर उतरले; सफरचंद ४० ते ८० तर सीताफळ २५ ते ४० रुपये किलो

11
0
Share:

 

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये आज एकूण ३५० गाड्यांची आवक झाली आहे. फळांच्या दर उतरल्याचे दिसून येत आहेत. अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होत. त्यामुळे फळांच्या किंमतींनी सणासुदीच्या काळात आसमान गाठले होते. मात्र आता फळांच्या किंमतीत स्थिरता आली आहे.

सध्या फळ बाजारात सफरचंद ४० ते ८०, सीताफळ २५ ते ४०, खरभुज १५ ते २५, अननस २६ ते ३० रुपये किलो विकले जात आहे तसेच डाळिंब ४० ते १०० रुपये किलोने विकला जात असून डाळींबाच्या किंमती आणखी घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.
मात्र किरकोळ बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने फळांचे भाव वाढून ते विकले जात आहेत. त्यामुळे दरवाढीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागणार आहे.

Share: