मुंबई police कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर,सिडकोची उद्या 4 हजार 466 घराची लॉटरी जाहीर होणार

11
0
Share:

*सिडकोची पोलीस कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजना

उद्या निघणार सोडत

*पाच नोडमध्ये 4 हजार 466 सदनिका साकारताहेत

*पाच नोडमध्ये 4 हजार 466 सदनिका साकारताहेत

नवी मुंबई: सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्‍यांकरिता विशेष गृहनिर्माण योजनेंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 4 हजार 466 घरांची संगणकीय सोडत उद्या, 10 नोव्हेंबर रोजी सातवा मजला, सिडको सभागृह, सिडको भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे दुपारी 12 वाजता काढण्यात येणार आहे.

सिडको महामंडळातर्फे पोलीस कर्मचार्‍यांकरिता एका विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ 27 जुलै 2020 रोजी करण्यात येऊन त्या अंतर्गत 4 हजार 466 घरे (सदनिका) पोलीस कर्मचार्‍यांकरिता उपलब्ध करुन देण्यात आली होती. सदर गृहनिर्माण योजनेंतर्गत पोलीस कर्मचार्‍यांकरिता नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये 4 हजार 466 सदनिका साकारण्यात येत आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता उपलब्ध असणार्‍या या योजनेतील सदनिका या केवळ मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांकरिताच राखीव आहेत. एकूण 4 हजार 466 सदनिकांपैकी 1 हजार 57 सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि 3 हजार 409 या अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत. 27 जुलै 2020 पासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होऊन सदर योजनेस उत्तम प्रतिसाद लाभला. अर्ज नोंदणी, शुल्क भरणा इ. सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या.

सदर सोडतीचे https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर वेबकास्टींगच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येऊन अर्जदारांना घरबसल्याही निकाल पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच निकालाविषयीची अद्ययावत माहितीही सदर संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

Share: