मुंबई Apmc घाऊक बाजारात भाजीपाला भावात घसरण वाटाणा 60 रु किलो तर कोथिंबीर 5 रु जुडी 

14
0
Share:
नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये  दिवसेंदिवस भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असतानाच भाजीपाला मार्केटमध्ये गाड्यांची आवक वाढली आहे. आज मार्केटमध्ये एकूण 490 गाड्यांची आवक झाल्याने भाजीपाल्याच्या दरात घसरन झाली आहे. त्याचबरोबर बाजारात 150 किलो विकला जाणार वाटाणा हा आज 60 रुपये किलोने विकला गेला आहे. तसेच 30 रुपये जुडी विकली जाणारी कोथिंबीर आज बाजारात 5 रुपये किलोने विकली जात आहे. अश्याच प्रकारे सर्व भाज्यांच्या दरात घसरण झाली असून मिरची 30 ते 60 तर शिमला मिरची ही 40 ते 50 रुपये किलोने विकली जात आहे. घाऊक बाजारातील भाज्यांच्या दरातील खरी वस्तुस्थिती पाहता दर कमी असूनही किरकोळ बाजारावर कोणत्याच प्रकारचे निर्बंध नसल्याने हाच भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पट किंमतीने विकला जात आहे, त्यामळे सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. तर नेमका एपीएमसी बाजारातील भाजीपाल्याचा आजचा भाव हा कशा प्रकारे आहे हे आपण जाणून घेऊया
1) काकडीचा आजचा बाजार भाव हा – 18 ते 20 रुपये किलो
2) फरसबी – 40 ते 50 रुपये किलो आहे
3) कारले – 30 ते 32 रुपये किलो आहे
4) मिरचीचा भाव हा – 30 ते 60 किलो
5) कोबी हा – 30 ते 32 किलो
6) दुधीचा भाव हा  – 18 ते 20 किलो
7) शिमला मिरचीचा भाव हा – 40 ते 50 किलो
8) गवार – 36 ते 40 किलो
9) गाजर – 14 ते 16 किलो
10) भेंडी – 20 रुपये किलो
11) कोथिंबीरची जुडी- 5 रुपये
12- तर वांगी ही – 20 किलो आहे.
Share: