Malegaon Breaking | आरोग्यमंत्री राजेश टोपेंसोबत बैठक सुरु असतानाच रिपोर्ट आला, मालेगावचे मनपा आयुक्त कोरोना पॉझिटिव्ह

17
0
Share:

 

नाशिक : नाशिकात कोरोना हॉटस्पॉट असलेल्या मालेगावातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मालेगावातील महापालिका आयुक्तांसह एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. एका महापालिका आयुक्तालाच कोरोना झाल्याने मालेगावातील जनतेची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक सुरु असताना या पालिका आयुक्तांना कोरोना (Municipal Corporation Commissioner Corona Report) झाल्याची माहिती मिळाली.

मालेगाव हे कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं आहे. नाशकात सध्या कोरोनाचे एकूण 741 रुग्ण आहेत. त्यापैकी एकट्या मालेगावात 616 रुग्ण आहेत. शिवाय, मालेगावातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासोबत मालेगावात आज दुपारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालिका आयुक्त आणि इतर अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते . अगदी आमोरासमोर ही बैठक सुरु होती. बैठक सुरु असतानाच पालिका आयुक्तांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं कळालं. त्यानंतर आयुक्तांना तात्काळ क्वारंटाईन कक्षात नेण्यात आलं.

काहीच दिवसांपूर्वी पालिका आयुक्तांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आज आला. या अहवालात आयुक्त आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

आज आलेल्या 40 अहवलांपैकी 11 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 7 पुरुष आणि 2 महिलांचा (Municipal Corporation Commissioner Corona Report) समावेश आहे.

Share: