किसान सन्मान अंतर्गत खात्यावर टाकलेले पैसे वापस घेतले…

20
0
Share:

शेतकऱ्यांचा हा सन्मान नव्हे अपमान: अजित नवले

मोदी सरकारने आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्याच्या बाबतीत एक मोठी घोषणा केली ती म्हणजे कृषी सन्मान योजना हा खूप महत्वाची सरकारी योजना होती आणि हि योजना फक्त अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लागू होती म्हणजे जा शेतकऱ्याची शेती हि ५ एकर पेक्षा कमी आहे त्या शेतकऱ्यांनाच ह्या योजनेचा लाभ घेता येणार भारतात याची संख्या जवळजवळ १२ कोटी शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत आणि लोकसभेच्या निवडणूका जवळच आल्या आहेत त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गाला खुश करण्यासाठी केंद्र सरकारने हि योजना चालू केली असं विरोधकांचं म्हणणं आहे. खर्च या योजनेचा लाभ सर्व शेतकर्यांना मिळतो कि नाही हा प्रश्नचिन्ह आहे.

अहमदनगर तालुक्यातील वाळूंज येथे शेतकरी मिनीनाथ मीनसे याच्या बँक खात्यावर दिनांक २४ फेब्रुवारी ला कृषी सन्मान योजनेचा पहिला हप्ता २००० रु खात्यावर आले परंतु ते पैसे त्याच्या खात्यातून प्रत माघारी वळवण्यात आले हे त्यांना आपल्या मोबाईल वर आलेल्या मेसेज वरून कळले त्यांनी बँक एटीम मधून बँक स्टेटमेंट काढली असता त्यांना हा सगळं प्रकार कळाला त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप शान करावा लागत आहे.
किसान सन्मान अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेले पैसे परत घेतले जात असल्याचा बातम्या येत आहेत आणि साडेचार वर्षाच्या नाकर्तेपणावर निवडणुकीपूर्वी पांघरून घालण्यासाठी सरकारने चालविलेल्या घिसाडघाईमुळेच हा गोंधळ होतो आहे. शेतकऱ्यांना यामुळे मदती ऐवजी मनस्तापच वाटयाला येणार हे उघड आहे. शेतकऱ्यांचा हा सन्मान नव्हे अपमान आहे. असं मत अखिल भारतीय किसान संघटनेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले मांडलं आहे.

Share: