नवी मुंबईकरांना लवकर मिळणार मेट्रोची सवारी

20
0
Share:

नवी मुंबई: गेल्या पाच वर्षांपासून अधिक काळ रखडलेल्या सिडकोच्या मेट्रो-1 चे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी नवी मुंबईकरांना अजून तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.आज संध्याकाळी तळोजा येथे नवी मुंबई मेट्रो बाबत सिडको कडून टेस्टींग सुरू झाली आहे Catenary Maintainance Vehicle (CMV) कडून testing मेट्रो मार्गावर टाकण्यात आलेल्या ओव्हर हेड वायरींग ची तपासणी सुरू करणयात आली आहे.

सिडकोतर्फे मेट्रो रेल्वेसाठी तयार केलेल्या पूलावरून ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यावर नोव्हेंबर ते डिसेंबरपूर्वी चाचणी घेण्याचा प्रयत्न होते. विधानसभेच्या आचारसंहिते आधीच मेट्रोची चाचणी घेण्याचे राज्य सरकारचे स्वप्न राहील का या स्वप्नच राहणार आहे.अजून पिलर आणि प्लेटफर्म तैयार झाली नसून सिडकोने सहा वर्षांपूर्वी सुरू केलेली मेट्रो आत्तापर्यंत फक्त ट्रॅकपर्यंतच मर्यादित राहिली आहे.

बेलापूर ते पेंईधर या 11 किलो मीटरच्या मार्गावर सिडकोला 99 टक्के ट्रॅकचे काम पूर्ण करण्यात यश आले आहे. या मार्गावरील 11 रेल्वे स्थानके सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतरही अद्याप पूर्ण करण्यात सिडकोच्या अभियंत्यांना अपयश आले आहे. मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत सिडकोचे तीन व्यवस्थापकीय संचालक बदलून गेले आहेत. जुने कंत्राटदार दिवाळखोरीत निघाल्याने सिडकोने नव्या कंत्राटदारांच्या खांद्यावर रेल्वे स्थानकांच्या कामांची जबाबदारी सोपवली आहे.

मेट्रोच्या 11 स्थानकांपैकी सिडकोने 1 ते 6 मेट्रो स्थानकांच्या कामांसाठी प्रकाश कन्सोरियम यांना 127 कोटी रूपयांचे कंत्राट दिले आहे. 7 व 8 क्रमांकाचे मेट्रो स्थानकाचे काम बिल्ड राईड हा कंत्राटदारामार्फत सुरू आहे. 8 व 11 रेल्वे स्थानकाचे 43 कोटी रुपयांचे काम यूनिवास्तू यांना, तर 10 क्रमांकाचा मेट्रो स्थानक तयार करण्याचे 53 कोटी रूपयांचे काम जे. कूमार यांना देण्यात आले आहे.

सिडकोने उड्डाणपूल तयार करून त्यावर रेल्वे ट्रॅकही बसवण्यात आला आहे. मात्र, रेल्वे स्थानकांची कामे पूर्ण नसल्याने 11 रेल्वे स्थानकांदरम्यान 150 मीटर पर्यंतचे रेल्वे ट्रॅक जोडण्यात अडचणी येत आहेत. हे ट्रॅक एकमेकांना जोडले नसल्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांना मेट्रोची चाचणी घेताना अडचणी येत आहेत.

वाढता वाढता वाढे

नवी मुंबईच्या मेट्रो मार्गाचे काम लांबणीवर पडल्यामुळे दोन हजार कोटींमध्ये होणारे काम आता तीन हजार कोटींमध्ये सिडकोतर्फे पूर्ण केले जाणार आहे. यापैकी 11 किमीचा रेल्वे उड्डाणपूल, वीज जोडण्या, सिग्नल यंत्रणा, मेट्रोचा कारशेड, आदी दोन हजार कोटींची कामे सिडकोने पूर्ण केली आहेत. मात्र, रेल्वे स्थानकांचे बांधकाम व अंतर्गत सजावटीसाठी आणखीन एक हजार कोटींचा खर्च सिडकोला अपेक्षित आहे.

या सर्व सोपस्कारासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने प्रत्यक्षात नवी मुंबईच्या मेट्रोची सफर करण्यासाठ अजून तीन महिने पर्यंतचा दिवस उजडेल असा अंदाज सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

Share: