मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग; कोरोनाला हरवणार कसं?

7
0
Share:

नवी मुंबई : सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे .दरम्यान नवी मुंबईत कोरोनाबधितांची संख्येत दररोज वाढ होत असून मृतांमध्ये दररोज वाढ होत आहे.वढ्यात संसर्गमुळे शहरात शुक्रवारी 308 नवे रुग्ण वाढले असून कोरोना रुग्णाची संख्या 13,000 पार गेला आहे आणि एकूण 370 जणांची मृत्यू झाला आहे .सध्या नवी मुंबईमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन असताना. आशा परिस्थितीत नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपला मार्केट मध्ये सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा उडालेला आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने भाजीपाला बाजारात 250 गाड्यांची आवक करण्याचे ठरवले होते. पण व्यापाऱ्यांनकडून या नियमांचे उल्लंघन होत आहे. काही व्यपाऱ्यानि  जास्त गाड्या मागवल्याने बाजारामध्ये  मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.आज बाजार आवारात जवळपास 350 ते 400 गाड्याची आवक झाले असून  15 ते 20 हजार लोकांची गर्दी झाली. या  गर्दीमुळे एपीमसी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाले ज्यामुळे अँबुलन्स जाण्यास देखील मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला. या बाबतीत पूर्ण बाजारात काही व्यापाऱ्याना विचारपूस केलं असताना व्यापाऱ्यांनी सांगितले कि मार्केटमध्ये असलेल्या 4 विंगच्या इन्स्पेक्टर मुळे मार्केटमध्ये आवक वाढली आहे यामध्ये काही व्यापारी प्रतिनिधीचा समावेश आहे .बाजारसमितीच्या मार्केट निरीक्षक मुळे  C & D विंगमधील भाजीपाला किरकोळ  विकायला साठी खुली सूट दिली आहे त्यामुळे बाजार आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी होयला सुरुवात झाला आहे.
नवी मुंबई एपीमसी प्रशासनाकडून गाड्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही. नवी मुंबईत कडकडीत बंद आहे. मात्र एपीमसी ची ही दृश्य पाहून तुम्ही समजू शकता की इथे कोणीही लॉकडाऊन च्या नियमांचे पालन करत नाहीत. लोकं ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळत आहेत.

एककीकडे जर आपण बघितलं तर नवी मुंबईच्या आयुक्तांकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिवसरात्र उपयोजना चालू आहेत. मात्र एपीएमसी मधील या तुफान गर्दीमुळे कोरोनाला रोखणार कसं. असा प्रश्न महापालिका प्रशासनाससमोर उभा राहीला आहे.

Share: