शेतमालाला जास्त भाव देण्याचं अमिश दाखवून शेतकऱ्यांला 19 लाखांचा गंडा घालणाऱ्या भामट्यांला पोलिसांनी केला अटक

कल्याण: शेतकरी आधीच अडचणीत असताना कल्याममधील भामट्याने एका शेतकऱ्यांला शेतमालाला जास्त भाव देण्याचं आमिष दाखवून 19 लाखाचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अस्लम शेख हा शेतकऱ्यांकडून विविध प्रकारची फळे 10 रुपये जास्त किलोने घेऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करायचा. आणि नंतर मोठ्या प्रमाणात फळे घेऊन शेतकऱ्यांना चेक द्यायचा.

जुन्नर मधील शेतकरी संतोष भोरकडून अस्लम ने 19 लाखांचा माल घेऊन चेक दिले. चेक बाऊन्स झाल्याने संतोष भोर यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. व त्यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.

याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बनकर यांनी पोलीस अधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे हा तपास सुपूर्त केला. या तपासात असे समोर आले की, अस्लम शेख ह्या भामट्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. राज्यातील किती शेतकऱ्यांना खोटं आमिष दाखवून फसवले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

You may have missed