नवी मुंबईत वेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्या 6 नायझेरियन नागरिकांवर कारवाई,पोलिसांची नजर आता परदेशी नागरिकांवर

18
0
Share:
नवी मुंबई :गुन्हेगारीच्या घटनांमध्ये परदेशी नागरिकांचे वाढते प्रमाण पोलिसांसाठी डोकेदुखी बनली आहे. त्यामुळेच आता शहरातील परदेशी नागरिकांच्या हालचालींवर पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह  यासंदर्भात एक परिपत्रक काढले असून सर्व पोलीस ठाण्यांना ते पाठवण्यात आले असून सतर्क राहण्याची आदेश दिले आहे .
वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि जुहू गाव परिसरात साई दर्शन बिल्डिंग मध्ये  काही परदेशी नागरिक वेकायदेशीरपणे राहत आहे ,पोलसांनी ६ अधिकारी आणि २० कर्मचारी घेऊन सादर इमारतीमध्ये छापा टाकला असता त्या ठिकाणी नायझेरियन नागरिक महिला ओबीओरा आनीववेब यांना ताब्यात घेतला ,या इमारतीच्या दुसरा मांजल्यावर ओझीबीया किचन्स ग्रिल मल्टी फॅमिली रिस्तूरांत नावाचे अवैध हॉटेल चालवताना आढळून आले ,त्या ठिकाणी महिलांची साथीदार मिळून या रूम मध्ये हॉटेल आणि अबैद्ध दारू बिक्री करत होते या मध्ये दारूच्या साठा आढळून आले ,एकूण ६ जाणाच्या विरोध वाशी पोलिसांनी साथी रोग कायदा ,दारूबंदी व पासपोर्ट अधिनियम ६५ (e ) भारतामध्ये वेकायदेशीर वास्तव करण्याची गुहा वाशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे त्याच्या कडून जवळ्पास १७ हजार किमतीच्या दारू जप्त करण्यात आले आहे ,सदरची कारवाई पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त विनायक बस्त ,वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ आणि त्याचे पथक यांनी केले आहे ,
अटक करण्यात आलेल्या नायझेरियन  नागरिकाचे नाव 
ओबीओरा आनीववेवा ,प्रिन्स ओकी जॉन ,अहोमो इले  हेलन ,चुकुडी लुके उसळोआऱ ,नलोमोरीस कॉसमॉस चीनन्ये ,ओकेयो तुचुकोया फिलिप आहे . 
नवी मुंबईत राहणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे . त्यातही प्रामुख्याने नायजेरियन लोकांची संख्या जास्त आहे. हे परदेशी विद्यार्थी व्हिसावर मुंबईत शिक्षणासाठी येतात. परंतु अनेक गुन्’ाांमध्ये हे परदेशी नागरिक सामील असल्याचे आढळून आले आहे. अंमली पदार्थाच्या व्यवहारात बहुतांश आरोपी परदेशी आहेत. याच बरोबर ऑनलाइन घोटाळ्यातही प्रमुख आरोपी परदेशी नागरिकच असल्याचे समोर आले आहेत.हे परदेशी नागरिक विद्यार्थी व्हिसा घेऊन भारतात येतात आणि नंतर येथेच स्थाईक होतात. त्यामुळे या परदेशी नागरिकांच्या कागदपत्राची तपासणी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त यांनी दिले  आहे. ज्या परदेशी नागरिकाचा व्हिसा संपला असेल त्यांना त्वरित कारवाई करून परत पाठविण्यात येणार आहे.परदेशी नागरिक जुहू गाव ,बोनकोडे ,कोपऱखेरने ,बेलापूर ,नेरुळ ,खारघर ,उलवे  परिसरात  राहतात. एकतर मुंबईलगतचे भाग, स्वस्तात घरे आणि  वेळ कमी यामुळे ते हा भाग निवडतात. मुंबईत अंमली पदार्थाची तस्करी याच परदेशी नागरिकांकडून मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे अंमली पदार्थ विरोधी शाखेकडून सांगण्यात आले.   उलवे, खारघर व इतर भागांत आफ्रिकन देशांतील नागरिक बेकायदा राहत आहेत, तसेच त्यातील अनेक परदेशी नागरिक हे गुन्हेगारी कारवाया करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी 2018-19 या वर्षात उलवे, खारघर व इतर भागांत छापेमारी करून त्या ठिकाणी राहणाऱ्या परदेशी नागरिकांचे पासपोर्ट व व्हिसाची तपासणी केली होती. या तपासणीत 54 विदेशी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपल्याचे आढळून आले. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या पारपत्र विभागाने या 54 परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या देशात रवाना केले. याशिवाय नवी मुंबई पोलिसांनी 2018 व 19 या दोन वर्षांत वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवून 70 घुसखोर बांगलादेशी नागरिकांची धरपकड केली. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करून 77 बांगलादेशी नागरिकांची त्यांच्या देशात रवानगी केली. यापुढेदेखील बेकायदा वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांचा व घुसखोर बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांची धरपकड करण्याची कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिह  यांनी सांगितले.
घुसखोरांचे बस्तान
पश्‍चिम बंगालमार्गे बेकायदा भारतात प्रवेश करणारे बांगलादेशी नागरीक हे  नवी मुंबई परिसरात झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. यातील पुरुष मंडळी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये हमाली व  बांधकाम साईटवर मिळेल ते काम करतात; तर महिला घरकाम करून आपला उदरनिर्वाह करतात. हे बांगलादेशी नागरिक कोणतीही कागदपत्रे न देता झोपडपट्टीत भाड्याने राहतात. त्यामुळे ते घुसखोर म्हणून ओळखले जातात. घरमालकाला त्यांच्याकडून चांगले भाडे मिळत असल्यामुळे, तेदेखील त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करत नाहीत. त्यामुळे बांगलादेशी घुसखोर वर्षानुवर्षे या ठिकाणी राहतात.
गुन्हेगारी पार्श्‍वभूमी
नायजेरियन नागरिक पर्यटन, शिक्षण, व्यवसाय अथवा वैद्यकीय व्हिसावर भारतात प्रवेश करतात. त्यानंतर हे नायजेरियन अथवा शैक्षणिक व्हिसा मिळवून भारतात येतात. त्यानंतर ते या ठिकाणी आपले बस्तान मांडून, गैरधंदे करायला सुरुवात करतात. भारतात आलेले बहुतांश नायजेरियन नागरिक हे ऑनलाईन फसवणुकीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यासोबत अनेक स्थानिक तरुण-तरुणी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अनेक नायजेरियन नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील ते याच ठिकाणी राहत असल्याचे पोलिसांच्या कारवाईवरून आढळून आले आहे.
Share: