मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची दरात घसरण सुरू. वाटाणा 18 रुपये ,कोबी 4 रुपये फ्लावर 6 रुपये किलो

31
0
Share:

नवी मुंबई-मुंबई एपीएमसी भाजीपला घाऊक बाजारात छटपूज पासून भाज्यांच्या दरात घसरण सुरू आहे ग्राहक नसल्याने बाजारात मालाची उठाव नाही.गुरुवारी भाजीपाला मार्केटमध्ये एकूण 670 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात मोठा प्रमाणात घसरण झालाआहे.भाजीपाला मार्केटमध्ये व्यापार करणाऱ्या व्यपारी बबन झेंडे यांनी सांगितले की,शेतकरी आपल्या शेतमाल थेट ग्राहकाकडे पाठवल्याने बाजार आवरत ग्राहक नाही त्यामुळे मालाच्या उठाव नसल्याने दरात घसरण सुरू आहे ग्राहक नसल्याने मालाच्या उठाव नाही मात्र व्यपारी माल जास्त मागवतात त्यामुळे राहिलेल्या शिल्लक माल दुसऱ्या दिवशी बिकायला लागतो सध्या 40 टक्के ग्राहक भाजीपला घाऊक बाजारात येत नाही अशी परिस्थिती झाली आहे.ग्राहक नसल्याने मालाची उठाव नाही 200 रुपये किलो बिकला जाणाऱ्या वाटाणा आता 18 रुपये किलो बिकला जात आहे ,तसेच 40 रुपये प्रतिकिलो बिकला जाणाऱ्या भाज्या आता 5 ते 15 रुपये किलो बिकला जात आहे .आता परराज्यातून भाज्यांची आवक मोठा प्रमाणात होत आहे त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे .शेतकऱ्यांना आपल्या हमीभाव मिळत नसल्याने ते थेट मुंबई व उपनगरात आपल्या शेतमाल थेट पाठवण्यात सुरू केली आहे त्यामुळे बाजारात ग्राहक नसल्याने मालाची उठाव नाही .दरात घसरण होऊन सुद्धा मालाच्या उठाव नाही अशी माहिती व्यपाऱ्याने दिली आहे.आज बाजार आवारात 70 गाड्याची वाटाणाचे आवक झाली आज त्यामध्ये मध्यप्रदेश येथून हिरवा वाटाणा जवळपास 3 हजार क्यूइंटल ,राजस्थान मधून वाटाणा दाखल झाला आहे.त्यामूळे 200 रुपये किलो बिकला जाणाऱ्या वाटाणा 18 रुपये प्रतिकिलोवर आला आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्यामुळे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.दुधी भोपळा 10 ते 12,कोबी 6 रुपये,फ्लॉवर 4 रुपये,फरसबी,गवार, बांगी,कारला यांच्या दरामध्येही मोठी घसरण झाली आहे,टोमॅटो 15 रुपये,वाटाणा 18 रुपये प्रतिकिलोवर बिकला जात आहे तसेच कोथिंबीर 3 रुपये तर मेथी 4 रुपये जुडी बिकला जात आहे.घाऊक बाजारात ग्राहकांना दिलासा मिळतो मात्र किरकोळ मध्ये कुठल्याही नियंत्रण नसल्याने दुपटीने बिकला जात आहे.मार्केटमध्ये दिल्ली,गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश मधून मालाची आवक झाल्याने आवक वाढली त्यामुळे मोठा प्रमाणात घसरण झाला आहे

Share: