मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये सहा पान टपऱ्या बाजारसमितीने केल्या सील, फळ,धान्य,मसाला व कांदा बटाटा मार्केट मध्ये कारवाई कधी होणार!

6
0
Share:

मुंबई एपीएमसी विकास शाखेच्या आशीर्वादाने बाजार आवारात अनधिकृत स्टॉलवर गुटखा विक्री जोरात

वारंवार नोटीस देऊनही गुटख्याची स्टॉलवर विकास शाखेच्या माध्यमातून कारवाई होत नसल्याची बाजार परिसरात चर्चा .

-टपऱ्यामध्ये 15 ते 20 प्रकारच्या अवैध व प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री.

-ठाकरे सरकार कडून गुटखा विक्रेत्यावर मोक्का लावण्यात निर्णय घेतल्याने बाजार समितीकडून कारवाई.

–एपीएमसी पोलीस व अन्न औषधी प्रशासन कडून पान टपऱ्या सील केला जातो , बाजार समिती कडून पुन्हा टपऱ्या देण्यात येतात .

नवी मुंबई:महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही, परराज्यातून येणाऱ्या अवैध गुटख्यामुळे शालेय विद्यार्थी,बाजार परिसरातील कामगार व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी, गुटखा कंपनीच्या मालकांवर तसेच अवैध व्यवसायातील सूत्रधारांवरच ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्या अनुषंगाने बाजार समिती प्रशासना कडून भाजीपाला मार्केट मध्ये असलेल्या सहा पान टपऱ्यावर कारवाई करण्यात आली असून या टपऱ्या सील करण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गुटखा विक्रेतेवर कठोर कारवाईच्या आदेश दिले होते या आदेशाच्या प्रत्यक्ष पाहायला मिळाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केट मध्ये ,बाजारसमिती विकास शाखा कडून वाटप करण्यात आलेल्या पान टपऱ्यावर गुटखा बिकला जात होता . एपीएमसी पोलीस व अन्न औषधी प्रशासन कडून वारंवार एपीएमसी प्रशासनाला पत्र देउन सुद्धा ते कारवाई करत नव्हते ठाकरे सरकार कडून गुटखा विक्रेतावर कठोर कारवाईचा निर्णय घेतल्याने बाजार समिती प्रशासना कडून भाजीपाला मार्केट मध्ये असलेल्या सहा पान टपऱ्यावर कारवाई करण्यात आली असून या टपऱ्या सील करण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही फळ,धान्य ,मसाला व कांदा बटाटा मार्केटमध्ये अशा प्रकारे अवैध रितीने गुटखा विक्री करणाऱ्या टपऱ्यावर अजूनही का कारवाई होत नाही? अशी चर्चा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात होत आहे. मागील आठवड्यात एपीएमसी पोलीस व अन्न औषधी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कारवाईत पाच मार्केटमध्ये असलेल्या काही टपऱ्यावर गुटखा विक्री होत असल्याचे आढळून आले होते याची लेखी तक्रार संबंधित अधिकारी यांनी बाजार समितीला दिले होत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी अनिल चव्हाण यांनी,”आम्ही विकास शाखेकडे अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यासाठी पत्र दिले आहे तसेच अनधिकृत पणे चालवणाऱ्या होटेलला नोटीस पाठवण्यात आली आहे लवकर आम्ही कारवाई करू, मात्र विकास शाखा कडून आता पर्यंत कुठल्याही नोटीस पाठवण्यात आली नाही फळ मार्केटमध्ये हॉटेल चालवणाऱ्या सांगितले आम्हाला कुठल्याही नोटीस मिळाली नाही या मध्ये असे दिसून येत आहे की विकास शाखेच्या आशीर्वादाने बाजार परिसरात अनधिकृत खाद्यपदार्थचे दुकान व गुटख्याची विक्री होत आहे . उपमुख्यमंत्री अजित पवारयांच्या कठोर निर्णयमुळे भाजी बाजारातील सहा गुटखा विक्री करणाऱ्या टपऱ्यावर कारवाई करण्यात आली , मात्र इतर चार मार्केट मध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही या मध्ये असे दिसून येत आहे की बाजार समिती प्रशासन व विकास शाखेचे अधिकारी डोळेझाक करीत आहेत.

Share: