धक्कादायक! कुटुंबावर दुःखाचा डोंगर; अवघ्या एका आठवड्यात APMC मार्केटच्या 2 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू…

16
0
Share:

नवी मुंबई: नवी मुंबईत सध्या कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा 27 हजार पार गेला आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 600 पार गेली आहे.आता सध्या मुबंई एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून. एकाच आठवड्यात मसाला मार्केट व धान्य मार्केटमधील 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 4 दिवसांपूर्वी धान्य मार्केट निरीक्षक विनायक कांबळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आज मसाला मार्केटमधील कनिष्ठ निरीक्षक नारायण खंडागळे यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कांबळे हे निरीक्षक म्हणून मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये रुजू झाले होते यापूर्वी ते भाजीपाला मार्केटमध्ये कार्यरत होते .कांबळे यांना कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला आहे, यापूर्वी कांबळे यांच्या पत्नीचा 6 महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. त्यांच्या घरी मुलगा, मुलगी व 70 वर्षांच्या आई आहेत. कांबळे यांच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे. कांबळे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तर आज मसाला मार्केटमधील कनिष्ठ लिपिक नारायण खंडागळे यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना नेरुळ येथील खाजगी रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते. पण त्यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने खंडागळे यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कोरोना विषाणू विरुद्ध देत असलेल्या लढ्यात विनायक कांबळे तसेच नारायण खंडागळे यांनी आपल्या बहुमूल्य आयुष्याचा त्याग केला आहे. त्यांचे हे बलिदान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कधीही विसरणार नाही. त्यांच्या परिवाराच्या दुःखात संपूर्ण एपीएमसी परिवार सहभागी आहे. व यापुढे त्यांच्या परिवाराच्या पाठीशी आपला सर्व एपीएमसी परिवार उभा राहील.

Share: