Shocking News: कोरोनाबाधित सुरक्षा कर्मचाऱ्यांचा कल्याण ते एपीएमसी दुतर्फा प्रवास , आरोग्य अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ.

25
0
Share:
*Apmc  आरोग्य अधिकाऱ्यांच्या अमानवी कृत्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाला कल्याण ते एपीएमसी दुतर्फा प्रवास .
एपीएमसी प्रशासकीय इमारतमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांनी भेटीसाठी एक तास थांबवले.
-सुरक्षा कर्मचाऱ्यांला बघून एपीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय पाटील यांनी तिथून पळ  काढला.
-प्रशासनाचे उपचारात मदतीसाठी दाखवलेल्या उदासीनतेमुळे या कर्मचाऱ्याने पुन्हा कल्याणला जाऊन स्वतःला केडीएमसी रुग्णालयात दाखल करून घेतले.
नवी मुंबई– कोरोना बाधित रुग्णाला मदती ऐवजी अधिकाऱ्यांनी त्याला वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार एपीएमसी मध्ये घडला आहे. यामुळे जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर अधिकाऱ्यांच्या अमानवी कृत्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाला कल्याण ते एपीएमसी असा दुतर्फा प्रवास करावा लागला.
एपीएमसी मार्केट मध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.रुग्णाची संख्या 110 वर पोहचले आहे त्यास  प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही प्रकारे सोशल डिस्टंशिंगचे पालन न करता एपीएमसी मार्केट मध्ये व्यवहार चालत आहेत. त्यामध्ये एकमेकांशी संपर्कात आल्याने व्यापारी, कामगार तसेच अधिकारी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.
अशातच एका कोरोना बाधित सुरक्षा रक्षकाला उपचारासाठी मदती ऐवजी आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवून पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजी मार्केट मध्ये हा सुरक्षा रक्षक कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी त्याची चाचणी करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे अपेक्षित होते.
या अपेक्षेने  या कर्मचाऱ्याने कल्याणहून एपीएमसी प्रशासकीय इमारत गाठली असता आरोग्य अधिकाऱ्यांनी भेटीसाठी एक तास थांबवले. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांला बघून एपीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय पाटील यांनी तिथून पळ  काढला. प्रशाशनानेच उपचारात मदतीसाठी दाखवलेल्या उदासीनतेमुळे या कर्मचाऱ्याने पुन्हा कल्याणला जाऊन स्वतःला केडीएमसी रुग्णालयात दाखल करून घेतले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोकण आयुक्तांच्या मार्गदर्शनखाली महापालिका आयुक्त अणासाहेब मिसाळ ,एपीएमसीचे प्रशासक अनिल चव्हाण यांनी मार्केट मध्ये व्यापार करणाऱ्या व्यापारी, कामगार,एपीएमसी कर्मचारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोरोनाचे चाचणी करण्यासाठी फळ व भाजीपाला मार्केट मध्ये 30 वैद्यकीय टीम लावून 4 ते 5 हजार कामगारांना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 59 जणांना लक्षणे आढल्याने त्याची स्वैब टेस्ट करण्यात आली होते.फळ व भाजीपला मार्केट मध्ये सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांला कोरोनाची लागण झाल्याने पूर्ण सुरक्षा कर्मचाऱ्या मध्ये भीतीच्या वातावरण पसरले आहे. काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुट्टी घेतली आहे .फळ मार्केट मध्ये एका सुरक्षा अधिकारीला कोरोनाची लागण झाल्याने त्याचा संपर्कात आलेले चार जणांना कोरोनाचे लागण झाली आहे. त्यामध्ये एपीएमसीचे सहायक सचिव व कर्मचारी, 2 सुरक्षा कर्मचारीच्या समावेश आहेत. तसेच 12 कामगारांच्या  कोरोना पजिटीव्ही रुग्ण आढळले आहेत, या घटनेनंतर कल्याण मध्ये राहणारे व एपीएमसी भाजीपला मार्केट मध्ये काम करणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याची सात दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी करण्यात आली. या चाचणीचे अहवाल 3 मे रोजी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या  हाती पडले. या विभागाचे सुरक्षा कर्मचाऱ्यांची करोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची कल्पना या सुरक्षा कर्मचारीला दिली. तसेच नवीमुंबईतील रुग्णालयात दाखल होण्याची सूचना केली. मात्र कोरोनाबाधित सुरक्षा कर्मी कल्याण मधून आपल्या बाईक मध्ये एपीएमसी प्रशासकीय इमारती मध्ये दाखल झाला होता त्यावेळी एपीएमसीच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय पाटीलला सांगितले की माझी रिपोर्ट पोजिटीव्ही अली आहे. मला रुग्णालयात दाखल करा हे ऐकताच  डॉ अजय पाटील यांनी तिथून पळ काढला. त्यानंतर कोरोनाबधित सुरक्षा कर्मचारी डॉक्टरांच्या प्रतीक्षेत   एक तास थांबला  होता. मात्र डॉक्टर आली नाही  म्हणून ते आपल्या बाईकवर कल्याण येथे जाऊन रुग्णालयात दाखल झाला .
या प्रवासादरम्यान अनेकजण त्याच्या संपर्कात आल्याचा संशय आहे. त्यामुळे या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या प्रवास करोनाच्या संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत.
एपीएमसी आरोग्य अधिकारी यांनी करोनाची बाधा झाल्यानंतर या कर्मचाऱ्याला  रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. असे असताना घरी जाण्याची परवानगी कशी दिली, त्यांना रुग्णवाहिकेतून घरी का पाठविण्यात आले नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
Share: