धक्कादायक बातमी: मुंबई APMC मार्केटमधील आरोग्य विभाग कोमात; गरोदर महिलेला 2 तास ठेवण्यात आले तात्काळत

23
0
Share:
तृषा वायकर, एपीएमसी न्युज
नवी मुंबई : नवी मुंबईकरांसमोर पुन्हा रुग्णवाढीचे संकट उभे ठाकले आहे. रुग्णांचा आकडा 15 हजारचा टप्पा गाठेल, तर मृतांचा आकडा 400 पार केला आहे.
नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी 12 तास कामाला वाहून घेतले आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे.अँटीजन व आरटीपीसीआर मिळून दर दिवशी 2 हजार रुग्णांची चाचणी केली जात आहे.एपीएमसी मार्केट मध्येही अँटीजन टेस्ट सेंटर केंद्र सुरू करण्यात आले आहे.महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चैन’ ही मोहीम राबविण्यात आली.
महापालिकाने तीन दिवसांपासून 1200 लोकांचे टेस्ट करण्यात आले आहे,आताच्या रिपोर्टप्रमाणे पन्नास पेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एपीएमसी प्रशासकीय इमारतीमध्ये कमीतकमी 10 ते 12 अधिकारी व कर्मचाऱ्यांना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. कोरोना पजिटीव्ही होऊन सुद्धा मार्केट आणि ऑफिसमध्ये ये जा करत होते.

त्याचबरोबर पाचही मार्केटमध्ये व्यापारी,माथाडी कामगार, सफाई कामगार, हे व्यक्ती आढळून आले आहेत. ज्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळतात, तिथे कंटेन्मेंट झोन लावण्यात येत नाही.

शनिवारी सकाळी एपीएमसी फळ मार्केट मध्ये धक्कादायक माहिती समोर आला . अँटिजेंन टेस्ट करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यामध्ये एका गरोदर महिलेचा व तिच्या नवऱ्याचा रेपोर्ट पॉझिटिव्ह आला. या महिलेला तात्काळ कोविड सेंटरला पोहचवणे आवश्यक होते परंतु, या महिलेला 2 तास बसमध्येच बसवून ठेवण्यात आले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. पण ह्या मार्केटमध्ये अद्यापही स्वतःची अँबुलन्स देखील नाही. एपीएमसी बाजार आवारात जे रुग्ण सापडतात ते त्याच ठिकाणी 2 ते 5 तास बसून असतात या रुग्णांना कोणत्याही प्रकारची तत्काळ सेवा दिली जात नाही. यामुळे रुग्णांची मानसिक स्थिती ढासळत आहे.

-नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सतेज पाटील यांनी महापालिका मुख्यालयास भेट दिली. एपीएमसी मार्केट बंद करणे शक्य नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्केट मध्ये विशेष उपयोजना कराव्या तसेच मार्केट मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची स्क्रिनिंग केली गेली पाहीजे. आणि एपीएमसी मार्केटवर विशेष लक्ष केंद्रित करा आशा सूचना यावेळी सतेज पाटील यांनी दिल्या खऱ्या. पण एपीएमसी मार्केट मधील काही व्यापारी,अधिकारी,आणि कर्मचारी यांच्या संगनमताने टोकनच्या नावाखाली पैसे घेऊन मोठ्या प्रमाणात गाड्याची आवक होत आहे. यामुळे मार्केट मध्ये मोठ्या प्राणावर गर्दी वाढली आहे. मार्केट मध्ये ना मास्क, वापरला जातो ना सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन केले जाते. अशी परिस्थिती असताना कोरोनाला कसं रोखणार अशी चर्चा बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे.

-एपीएमसी मार्केटमध्ये फक्त मंत्री येतात आणि सूचना देऊन जातात. परंतु, याठिकाणी या सुविधा सामान्य जनतेला देणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एपीएमसी मार्केटमध्ये स्वतःचे आरोग्य खाते आहे पण ते कोमामध्ये आहे. येथील आरोग्य अधिकाऱ्यांकडे MBBS ची पदवी देखील नाही.एपीएमसी मार्केट हे आता कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. नियंत्रणा बाहेर परिस्थिती असताना कशाप्रकारे एपीएमसी मार्केट मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखणार अशी चर्चा बाजार आवरामध्ये सुरू आहे.

Share: