धक्कादायक बातमी:मदत मागणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार,पोलिसांनी तिघांना केले गजाआड

21
0
Share:

नवी मुंबई: तूप विकणाऱ्या असाह्य 19 वर्षीय महिलेवर तिचे दागिने हिसकाऊन व बलात्कार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केले आहे.
घरोघरी तूप विकणाऱ्या 19 वर्षीय पीडित महिलेची घाटकोपर रेल्वे स्थानकातून लोकल पकडताना तिच्या नातेवाईकांपासून ताटातूट होऊन संबधीत महिला गर्दीत हरवली होती. महिला हरविल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. महिलाही तिच्या नातेवाईकांचा शोध घेत मुंब्रा रेल्वे स्थानकात पोहचली व ती रात्री तिथेच झोपली. दुसऱ्या दिवशी नातेवाईकांना शोधण्यासाठी ती दिवा रेल्वे स्थानकात गाठले मात्र तिथे तिला नातेवाईक सापडले नाही.
संबधित महिलेकडे खर्चाचे पैसे नसल्याने तिने तिच्या नाकातील सोन्याच फुलं विकण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकातील वृद्ध भिकारणीला विनंती केली. संबधित भिकारणीने सोन्याचे नाकातील फुलं विकण्यासाठी तिच्या म्हापे येथील झोपडपट्टीतील घरी पीडितेला नेले.मात्र सोन्याच फुलं विकणे शक्य न झाल्याने भिकारिन राहत असलेल्या झोपडपट्टीमधून पीडिता पायी चालत म्हापे परिसरातील साईसागर हॉटेल चौकात रात्री 8:30च्या दरम्यान आली. तिथे तिला एक रिक्षावाला भेटला असता,पीडितेने त्याला जवळपास असणाऱ्या रेल्वे स्थानकावर नेण्याची विनंती केली. पीडिता ही एकटी असाह्य असून संबधित परिसर तिला माहीत नसल्याचा फायदा घेऊन, रिक्षावाल्याने तिला, रिक्षात बसवले व 1तास म्हापे परिसरात फिरवले व धमकावून म्हापे परिसरातील पडीक ईमारतीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला व तिचे सोन्याचे कानातले, नाकातील सोन्याच फुलं व पायातील चांदीचे पैंजण जबरस्तीने काढून घेतले, व तिला धमकावत पुन्हा रिक्षात बसवून राम मंदीर परिसरात सोडून संबंधित रिक्षावाला पळून गेला. रात्री 12च्या सुमारास स्टेशनला कसे जायचे अशी पीडिता विचारत असताना ऍक्टिवा वरून जाणाऱ्या दोन मुलांनी तिला स्टेशनवर सोडतो असे सांगितलं व ट्रिपल सीट बसवले तसेच घणसोली रेल्वे स्थानकाच्या दिशेने नेऊन पुढे ठाणे बेलापूर मार्गावरील पाईपलाईन शेजारी नेले व दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.या घटनेचा गुन्हा कुर्ला पोलीस ठाण्यातून वर्ग होऊन रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सह पोलीस आयुक्त वाशी विभाग यांच्या अधिपत्याखाली रबाळे एमआयडीसी परिसरात पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली.व तिन्ही अनोळखी व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व ऍक्टिवा जप्त करून तिन्ही आरोपींना गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत अटक केले व पीडितेचे दागिनेही रिक्षावाल्या आरोपी कडून हस्तगत करण्यात आले.संबधित आरोपींना 29 फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share: