कोरोनाच्या MRI रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा,कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या शरीरात मिळाला पस.

13
0
Share:

औरंगाबाद मध्ये ,24 डिसेंबरला कोरोनाचं नवं रूप समोर आल्यानंतर मोदी सरकारसोबतच जगाची चिंता वाढली आहे. याचदरम्यान महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. औरंगाबादमधील एका महिलेला कोरोना झालेला कळला नाही मात्र कंबरदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर काढलेल्या रिपोर्टमधून धक्कादायक बाब समोर आली आणि डॉक्टर देखील चक्राऊन गेले. आतापर्यंत भारतात अशी ही पहिलीच केस सापडली असून याआधी जर्मनीत 6 रुग्ण आढळल्याचं देखील डॉक्टरांनी दावा केला आहे.
डॉक्टरांनी या महिलेची कोरोना टेस्ट केली मात्र ती निगेटिव्ह आली पण महिलेच्या शरीरात अॅन्टीबॉडी आढल्यानं कोरोना होऊन गेला मात्र तो महिलेला कळला नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या महिलेला 28 नोव्हेंबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता औरंगाबाद व्यतरिक्त अनेक ठिकाणी ह्या धक्का दायक बातमीची खलबल उढालि असल्याच समोर आल आहे .

औरंगाबादच्या बजाजनगर परिसरात राहणाऱ्या महिलेला कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला होता. हा त्रास खूप जास्त भयंकर वाटत होता. वारंवार उपचार घेऊनही बरं होत नसल्यानं डॉक्टरांनी या महिलेला MRI करण्याचा सल्ला दिला. या MRI च्या रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली. या महिलेल्या संपूर्ण शरीरात पस तयार झाला होता. त्यामुळे या महिलेला वारंवार कंबरदुखीचा त्रास जाणवत होता.

Share: