सायन- पनवेल महामार्ग ठरतोय मृत्यूचा महामार्ग!

21
0
Share:

नवी मुंबई:  सायन- पनवेल महामार्गावर  एक विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात होण्याचे मुख्य कारण म्हणजे सायन- पनवेल महामार्गावर कोणत्याच प्रकारची सुरक्षिततेची काळजी न घेता सुरु असलेलं काम. त्यामुळे  साताऱ्यावरून ऐरोलीच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सायन- पनवेल महामार्गावर सानपाडा येथील पादचारी पुलाखाली PWD कडून डिव्हाईडरचे खोदकाम चालू असूनही तेथे कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आलेलं नाही. त्याचबरोबर खोदकाम करून ते अपुऱ्या अवस्थेत सोडण्यात आलं असून यातील माती आणि दगडी ही रस्त्यावर पसरलेली आहेत.

सायन- पनवेल महामार्गावर गाड्यांची ये-जा सतत चालू असते, परंतु या महामार्गावर काही ठिकाणी विजेची सुविधा नसून रस्त्यावरील अपुऱ्या खोदकांमुळे हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग झाला आहे असेच म्हणावे लागेल.

 

Share: