कोरोना खंडित करण्यासाठी उपाययोजना आहेत पण, शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी उपयोजना का नाहीत ? सतीश देशमुख

16
0
Share:

नवी मुंबई: ‘जय जवान जय किसान’ अशी घोषणा तुम्ही नक्की ऐकली असेल..कदाचित तुमच्या तोंडुनही हे वाक्य कधीतरी निघालं असेल,पण एवढं फक्त बोलून शेतकरी आत्महत्या प्रकरण थांबेल का ?

शेतकरी जगासाठी आपला विचार न करता, आपण उपाशी राहू नये म्हणून राबराब राबून आपल्यासाठी धान्य पिकवतो.स्वतःची पर्वा न करता नांगर घेऊन शेतात घाम गाळत असतो.कोरोना काळात पूर्ण महाराष्ट्र स्थिरावल होत पण, शेतकरी मात्र राबत राहिला..त्याने एकदाही विचार नाही केला की,मला कोरोना झाल्यावर माझ्या परिवाराच काय होईल.

कोरोनाची साखळी खंडित व्हावी म्हणून महापालिका शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या,माणूस जर पैसेवाला असेल,तर त्या आत्महत्येची चौकशी दोन दोन राज्यांची पोलीस यंत्रणा करते,आणि लाखोंच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत आहेत तर साधा तलाठी सुद्धा चौकशी करत नाही,हे कितपत योग्य आहे ?

मी आपले पंतप्रधान, गृहमंत्री, आणि एनसीआरबीला अनेक स्मरणपत्रे पाठवली तरीसुद्धा त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, ही दुदैवाची गोष्ट आहे.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना या गंभीर विषयावर का गप्प आहे ? हा प्रश्न सतीश देशमुख (अध्यक्ष,फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स ) यांनी मांडला आहे.

कोरोनाच्या युद्धात डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मी यांचे कौतुक होत होते. परंतु जीवाची जोखीम घेऊन जीवनावश्यक वस्तू जसे धान्ये, फळे, दुध, भाजीपाला पुरवठा करणाऱ्या अन्नदात्याचा सर्वांना विसर पडला आहे.कोरोना काळात शेतकऱ्यांवर एकामागून एक संकटांच्या मालिकांना तोंड द्यावे लागत आहे.

तिकडे मराठवाडा, विदर्भ, खानदेशमध्ये बोगस बियाणांमुळे सोयाबीनचे उगवण न झाल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली आहे. बीज परीक्षण तपासणीमध्ये एक लाख क्विंटल बियाणे नापास झाले आहे. सावकारांकडून कर्ज घेऊन एवढे मेहनतीने पेरणी केल्यानंतर अर्धवट उगवलेल्या पिकांवर किंवा भाव मिळत नसल्यामुळे बहरून आलेल्या पिकांवर नांगर फिरताना शेतकऱ्यांना काय दुःख होत असेल? असे कित्येक प्रश्न आहेत, या प्रश्नांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.असे सतीश देशमुख यांनी सांगितले.

Share: