उडिद डाळीची आयात होणार 30 एप्रिलनंतर

22
0
Share:

नवी दिल्ली:वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने अतिरिक्त २.५ लाख टन उडिद डाळीची आयात करण्याची सीमा वाढवली आहे. वाणिज्य मंत्रालयाने ३० एप्रिलपर्यंत ही सीमा वाढविण्यात आली आहे. विदेश व्यापार महानिदेशालयाने (डीजीएफटी) याविषयी माहिती दिली आहे. दोन महिन्यात डीजीएफटीकडे यावर्षी उडिद डाळीची आयात ३१ मार्चपासून पुढे करण्यात यावी, अशा विनंत्या आल्या होत्या.

याप्रकरणाची चौकशी डीजीएफटीने केली आहे.  अतिरिक्त २.५ लाख टन उडिद डाळीची आयात करण्याची कालवधी ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याचा निर्णय घेतला. यानुसार भारताच्या बंदरांवरती आयात करण्यात येणारी डाळ ३० एप्रिल २०२० च्या आधी पोहोचली पाहिजे.

३० एप्रिलच्या आधी आयात करण्याची कामे पूर्ण करावीत अशा सूचना सर्व परवानाधारक उडिद व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात आहेत. कारण यानंतर वाटप करताना कोणत्याच विनंत्याचा विचार केला जाणार नाही. डिसेंबर २०१९ मध्ये सरकारने देशातील पुरवठा वाढवा यासाठी आणि किंमतींमध्ये होणाऱ्या भाव वाढीला आळा घालण्यासाठी मिल्स आणि रिफायनरींना ४ लाख टन उडिद डाळ आयात करण्याची परावानगी देण्यात आली होती.

Share: