कोरोनामूळे सीताफळाची मागणी घटली तर सफरचंद व खरभुज भाव वाढली!

20
0
Share:

नवी मुंबई : ऑगस्टमध्ये सीताफळाची सर्वाधिक मागणी असते पण यावर्षी मात्र सध्या ३५ ते ४० टक्के मागणी आहे.कोरोनामुळे सीताफळाला कमी मागणी मिळत आहे.
जुलै ते नोव्हेंबरपर्यंत एपीएमसी घाऊक बाजारात सीताफळाचा हंगाम सुरू असतो. बाजारात सीताफळ पुणे, शिरूर, जळगाव, नगर येथून ८ ते १५ गाड्यांची आवक होत आहे. मुंबईमध्ये सीताफळला अधिक मागणी असते. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे फेरीवाले बसत नसल्याने मागणी कमी झाली आहे. सीताफळ खाल्याने सर्दी होते अश्या तक्रारी आहेत,असे फळ व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या बाजारात सीताफळ प्रतिकिलो ६० ते ८० व ८० ते १२० रुपये दर तसेच, सफरचंद,खरबूज, पपई यांच्या दरातदेखील वाढ झाली आहे.ग्राहकांना सफरचंद 100 रुपये किलो तर पपई 40-50 रुपये प्रतिकिलो आहे.महाराष्ट्रात खरबुजाचा माल नसल्याने आंध्रा,कर्नाटक मधून या मालाची आवक होत असते.

Share: