मुंबई एपीएमसीच्या विकास शाखा,सुरक्षा अधिकारी व प्रशासनाच्या आशीर्वादाने बाजार परिसरात खुलेआम गुटखा विक्री.

22
0
Share:

टपऱ्यामध्ये 15 ते 20 प्रकारच्या अवैध व प्रतिबंध असलेल्या गुटख्याच्या खुलेपणे बिक्री.

ठाकरे सरकारच्या आदेशाला बाजार समिती प्रशासन कडून ठेंगा! 

पोलीस कारवाई करून पान टपऱ्या सील करतात ,काही दिवसात बाजार समिती प्रशासन कडून परत टपऱ्या देण्यात येते.

नवी मुंबई: गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा, त्याचे शालेय विद्यार्थी,बाजार आवारात असलेलं कामगारांना आणि तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर तसेच अवैध व्यवसायातील सूत्रधारांवरच ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेेत या आदेेशाला बाजार समिती प्रशासन कडून दुर्लक्ष होत दिसून येत आहे.

एपीएमसी पोलीस व अन्न औषधी प्रशासन संयुक्त कारवाई करून पान टपऱ्या सील करतात काही दिवसात पुन्हा बाजाराच्या आवारात गुटखा विक्री करून येरे माझ्या मागल्या अशी स्थिती बाजार समितीच्या आवारात दिसून येत आहे. ही गुटख्याची विक्री बाजारसमितीचे अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने होत आहे.बाजाराच्याआवारातील 40 ते 50 पान टपऱ्या या विकासशाखेच्या माध्यमातून वाटप करण्यात आल्या आहेत. या टपऱ्यामध्ये सर्वत्र प्रतिबंध असलेला गुटखा व गांजा विकला जात आहे.एकीकडे ठाकरे सरकारने गुटखा विकणाऱ्यावर कठोर कारवाई कारण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे बाजाराच्या आवारात बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या 40 ते 50 पान टपऱ्या मध्ये चक्क खुलेपणे गुटखा विकला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार वाटप करण्यात आलेल्या पान टपऱ्या बाजार समितीला दरमहिन्याला फक्त 1000 रुपये भाडे देत आहेत. शिवाय ज्या व्यक्तीला टपरीवाटप करण्यात आली आहे तो, तिथे स्वतः व्यवसाय न करता दुसऱ्यालाच भाड्याने देत असून दिवसाला 1500 रुपये आकारत आहेत. व महिन्याकाठी केवळ 1000 रुपये बाजारसमितीला भाड देऊन महिन्याला 45000 रुपये कमवित आहेत.
संबधीत ठिकाण हे एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असून, भाजीपाला मार्केट, फळ मार्केट,मसाला मार्केट,दाना मार्केट व कांदा बटाटा मार्केटमध्ये भरदिवसा गुटखा विक्री होत आहे. बाजार समिती मध्य्ये होणाऱ्या खुलेआम गुटखा विक्रीला
विकास शाखा व सुरक्षा अधिकारी यांचं अभय असल्याची चर्चा मार्केट परिसरात
आहे. मसाला मार्केट मधील D, E विंगमध्ये असलेल्या पानटपरीवर एपीएमसी पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत लाखो रुपयाचा गुटका जप्त करण्यात आला होता. संपूर्ण बाजार समिती मध्ये प्रतिबंधीत गुटख्याच्या धंद्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे . यापूर्वीही एपीएमसी पोलिसांनी कारवाई करून काही स्टॅल सील केले होते परंतु बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी एका महिन्यात पुन्हा ते स्टॉल उघडून परत गुटखा विक्रीसाठी दिले होते.पोलीस प्रशासन गुटखा विक्री करणाऱ्या टपऱ्यावर कारवाई करून टपऱ्या सील करत आहेत मात्र, बाजार समिती प्रशासन या टपऱ्या पुन्हा उघडत विक्रीसाठी देत आहेत. एपीएमसीतील बाजार आवारात देण्यात आलेल्या टपऱ्यामध्ये 15 ते 20 प्रकारच्या अवैध व प्रतिबंध असलेल्या गुटख्याच्या धंद्याची व्याप्ती पाहता या धंद्यातून बाजार समितीचे अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक मलिदा लाटत आहेत व ,त्यातील काही प्रमाणात वाटा आपल्या वरिष्ठ अधिकारी वर्गापर्यंत पर्यंत पोहचत असल्याची चर्चा बाजारात होत आहे.

Share: