Apmc News:खारघर पांडवकडा धबधबा मध्ये 30 तास शोधकार्य संपला ,नाही मिळाली नेहा दामाची मृतदेह

46
0
Share:

खारघर पांडवकडा धबधबा मध्ये 30 तास शोधकार्य संपला ,नाही मिळाली नेहा दामाची मृतदेह, शोधमोहीम मध्ये ड्रोन, अग्निशमन दल, पोलिसांसह स्थानिक नागरिक ।

नवी मुंबई:शनिवारी खारघर धबधबा परिसरामध्ये चार विद्यार्थिनी वाहून गेल्यानंतर तत्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले होते आठ तास सलग शोध घेतल्यानंतरही तीन मुलीचा मृतदेह सापडला होता,चौथा मृतदेह शोधण्यासाठी रविवारी सकाळी पासून शोधकाम सुरू होता बेपता झालेल्या नेहा दामा ची मृतदेह 30 तास होउन सुद्धा नाही मिळणी, सायंकाळी सात वाजता मोहीम थांबविली असून सोबरी पुन्हा मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले जाणार आहे. त्या साठी धबधबा मध्ये ड्रोन कॅमेरा ,अग्निशमन जवान, पोलीस कर्मी,स्थानिक गावकरी,पनवेल निसर्गचे टीम लागले होते।

पांडवकडा परिसरात पर्यटक वाहून गेल्याचे माहिती मिळाल्यानंतर खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार व त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडळ २ चे उपआयुक्त अशोक दुधे यांनीही घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन दलाचे जवान व पोलिसांनी तत्काळ धबधबा परिसरात वाहून गेलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. खारघर परिसरातील स्थानिक नागरिकांचीही यासाठी मदत घेण्यात आली. स्थानिक नागरिकांनी प्रवाहामध्ये जाऊन शोध घेण्यास सुरुवात केली. दुर्घटना झालेल्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर परिसरात आठ तासात तीन विद्यार्थिनींचा मृतदेह शोधण्यात यश आले परंतु एक मृतदेह मिळाली नाही ।


बेपता नेहा दामाची आई गीताने सांगितले सकाळी साडेसात वाजता नेहा कॉलेज जाण्यासाठी घरातून गेली होती. आम्हाला मुलगी खारघर धबधब्यामध्ये वाहून गेली असल्याचा फोन आल्यानंतर आम्ही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सकाळी साडेसात वाजता मुलीशी शेवटचा संपर्क झाला होता.

Share: