नवीन वर्षात अच्छे दिन येणार अशी, कृषी क्षेत्राची अपेक्षा

Share:

ओझर : गेल्या वर्षात कृषी क्षेत्रात देखील अच्छे दिन येणार हे स्पष्ट दिसत असताना द्राक्ष पंढरीत मोठी उलाढाल होत असताना मार्चच्या शेवटच्या टप्प्यात असताना कोरोनाने तेजीत सुरू असलेल्या बाजारात मंदीची लाट आली. सरते वर्ष २०२० हे जानेवारीत मोठ्या दिमाखात सुरू झाले असताना कोरोनाच्या लॉकडाऊनने अर्धे वर्ष निराशाजनक गेले असले तरी शिथिल झालेल्या लॉकडाऊनमुळे उत्साह दिसून आला. नवीन वर्षात कृषी क्षेत्राकडून तेजीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कित्येकांच्या परिवाराच्या कर्त्यांना कोरोनामुळे जग सोडावे लागले ही गोष्ट या वर्षीची सर्वाधिक मारक बाब ठरली. बाजारातील निर्देशांक देखील झपाट्याने कोसळला तर अनलॉक होत असताना त्याने हवा तसा आधार देखील दिला.यंदाची दिवाळी कशी जाणार या चिंतेत सर्वच असताना त्याआधी एक एक टप्पा शिथिल करताना नागरिकांनी देखील बाजारात नवे चैतन्य आणले.
पोलिसांनी गावातल्या प्रत्येक गल्लीला छावणीचे रूप दिले. सरकारचे सूक्ष्म नियोजन देखील तितकेच प्रभावशाली ठरले. मुंबईला काम करणारे परप्रांतीय मिळेल त्या वाहनाने उत्तरेकडे कूच करत होते. त्यावेळची ती विदारकता अनेकांच्या मनातून अद्याप गेलेली नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने त्यांना उपाशी न ठेवता आपल्या संस्कृतीचे दर्शन दिले. नियमांचे उल्लंघन केलेल्या अनेकांना दंडुक्याचा प्रसाद मिळाला तर तितके गुन्हे देखील दाखल झाले.

Share: