नवी मुंबईकरांसाठी खुश खबर,मोरबे धरण भरण्याची हॅट्रटीक,  मोरबे धरण भरले

9
0
Share:

नवी मुंबई महानगरपालिकेचे असणारे मोरब२ धरण हे रविवारी रात्री सुरु असणाºया मुसळधार पाऊसानंतर  पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातून विसर्ग होऊ लागला आहे. यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने  ऑगस्ट  महिन्यातच नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे प्रतिदिन 450 दशलक्ष क्षमतेचा मोरबे धरण पुर्ण भरले आहे. 88 मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केलील असून विसर्ग करण्यात आला  आहे. यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात समाधनकारक पावसाची नोंद झाली असून मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे.

मोरबे धरण हे सन 2013 मध्ये पुर्ण भरल्यांनतर सन 2016 पर्यत धरण पुर्ण क्षमतेने भरले नव्हते. मात्र  सन 2017  सन 2018 व सन 2019 या कालावधीत   मोरबे धरणाचा जलसाठा पूर्ण भरला आहे. सलग तीन वर्षे धरण पुर्ण क्षमतेने भरला असून धरण भरण्याची हट्रीटक झाली आहे. सन 2013 मध्ये 14 ऑगस्टला धरणे भरले होते. तर सन 2017 मध्ये 29 ऑगस्टला धरणे भरले होते. मात्र यंदा सन 2018 मध्ये 27 जुलै महिन्यातच धरण भरुन विसर्ग होऊ लागला आहे.  मात्र यंदा 4 ऑगस्ट रोजी धरण भरुन वाहु लागले आहे. धरण पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. यंदा जुन महिन्यात पाऊसाने हुलकावणी दिल्यांनतर. 4 जुलै पासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली होती. मात्र जुलै महिन्याच्या दुसºया आठवडयापासुन सततधार सुरु असणाºया मुसळधार पाऊसामुळे 4 ऑगस्ट रोजी धरण भरले आहे. व नवी मुंबईतील पाणी कपातीची चिंता मिटली आहे.

Share: