मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 7 दिवसात तब्बल 1 लाख 41 हजार 300 रुपये दंड वसुली

35
0
Share:

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये मास्क,सोशल डिस्टनसिंग पालन न करणाऱ्या विरोधात एपीएमसी प्रशासनाने जोरदार कारवाई सुरुवात केली असून. भाजीपाला मार्केटमध्ये 7 दिवसात 1 लाख 41 हजार 300 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.यापूर्वी एपीएमसी प्रशासनाकडून तीन महिन्यांत पाचही मार्केटमध्ये कारवाई करून 1 लाख 32 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला होता.यामध्ये भाजीपाला मार्केटमध्ये फक्त 150 जनावर कारवाई झाली होती. यापूर्वी तीन महिन्यात भाजीपाला मार्केटमध्ये 150 जनावर कारवाई करून हजार रुपये दंड वसुली करण्यात आला होता. तर आता 7 दिवसात 1 लाख 41 हजार 300 रुपयांचा दंड वसुली झाल्याने पूर्वी असलेल्या उप सचिववर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.

भाजीपाला मार्केट रात्री सुरू होतो सकाळी संपतो या मार्केटमध्ये दिवसात 12 ते 15 हजार लोकांची ये जा असतात ,आता रोज कारवाई झाल्याने मास्क आणि सोशल डिस्टनसिंग पालन न करणाऱ्या लोकांमध्ये खळबळ माजली आहे .भाजीपाला फळ व धान्य मार्केटमध्ये नियमांचे सर्वाधिक उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले होते ,फळ व धान्य मार्केटमध्ये कारवाई जोरात सुरू असून दिवसात 10 ते 15 हजार दंड वसुली केला जात आहे

एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपयोजना राबवण्यात येत आहेत. 30 सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी एपीएमसी मार्केटमध्ये धडक भेट दिल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरवात केली आहे.आयुक्तांच्या धडक भेटीनंतर एपीएमसी प्रशासनाने गर्दी असलेल्या भाजीपाला मार्केटमध्ये उप सचिव ,गेटच्या कर्मचारी , संपूर्ण सुरक्षाअधिकारी व कर्मचाऱ्यांना बदली करण्यात आली त्याच्या परिणाम आता मार्केटमध्ये हळूहळू दिसत आहे.
मुंबई एपीएमसी बाजार समितीने सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपयोजना करण्यास सुरवात केली आहे. मार्केटच्या प्रवेशद्वारावर तापमान व ऑक्सिजन तपासणीची सोय केली आहे. सध्यस्थितीत मार्केट पूर्वीप्रमाणे चालू आहे.
मार्केटमध्ये सुरक्षेसाठी सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करावे, मस्कचा वापर करण्यात यावा, असे आवाहन वेळीवेळी केले जात असून पण, अनेक कामगार, व्यापारी, व ग्राहकही मस्कचा वापर करत नाही. या सर्वावर कारवाई करण्याच्या सूचना सचिव अनिल चव्हाण यांनी दिल्या आहेत.

Share: