मुंबई एपीएमसीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १२५१ बाटल्या रक्त संकलित 

29
0
Share:
नवी मुंबई : कोरोना काळात मोठ्या प्रमाणात राज्यांत रक्त पुरवठ्याची टंचाई भासू लागली असल्याने सरकारने लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.
त्यानुसार मुंबई कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या वतीने शनिवारी महारक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एपीएमसी मार्केट मधील ५ ठिकाणी रक्तदान करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात १२५१ रक्तदात्यांची रक्तदान करून हे शिबीर यशस्वी केले. यात ४५ महिलांचाही समावेश होता.
या शिबिराचे उदघाटन आमदार आणि कामगार प्रतिनिधी संचालक शशिकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिका टाटा हॉस्पिटल, खारघर रिलायन्स हॉस्पिटल , कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अंधेरी ,हिरानन्दानी फोर्टीज हॉस्पिटल आणि अपोलो हॉस्पिटल यांनी सहकार्य केले. या शिबिरात व्यापारी हमाल. दलाल ,अडते, मदतनीस ,माथाडी कामगार ,बाजार समिती कर्मचारी,सुरक्षा कर्मी आदींनी रक्तदान केले. रक्तदान करणार्यांना प्रमाणपत्रासह , मदत किट भेट म्हणून देण्यात आली.
फळ बाजारात २९२ ,भाजीपाला बाजारात २०२ ,कांदा बटाटा बाजार आवारात १५६ ,मार्केट १ मध्ये ३२६ ,मार्केट २ मध्ये २७५ जणांनी रक्तदान केले.
बाजार समितीचे  संचालक संजय पानसरे, अशोक वाळुंज , शंकर पिंगळे, विजय भुता , निलेश वीरा यांनी प्रत्येक बाजार आवारात समन्वय साधून हे शिबीर यशस्वी केले. त्या बददल सभापती अशोक डक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
Share: