तूरडाळ व्यवहारातून १४ लाखांची फसवणूक तामिळनाडूच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

20
0
Share:

बनावट स्वाक्षरीचा धनादेश देत चौदा लाख चार हजार रुपयांना फसविल्याप्रकरणी तामिळनाडूच्या सक्थी ट्रेिडग कंपनीचा मालक अरिवदन आणि भास्करन यांच्याविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेदांतनगरात असलेल्या दिलासा अ‍ॅग्रो प्रोसेसर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मागील एक वर्षांपासून कुंदन अनिल कुलकर्णी (३१, रा. बंजारा कॉलनी) हे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कंपनी नोंदणी करून इंडिया मार्टच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधते. इंडिया मार्टच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून तामिळनाडूतील सक्थी ट्रेिडग कंपनीच्या अरिवदन याने डिसेंबर २०१८ मध्ये संपर्क साधला. या वेळी त्याने तूरडाळीचे नमुने मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मागविले. त्यानुसार अरिवदनला तीन प्रकारचे नमुने पाठविण्यात आले. नमुने पाहिल्यानंतर अरिवदन याने कंपनीला २१ टन डाळीच्या खरेदीची ऑर्डर दिली.
अरिवदनने, औरंगाबादला येऊन कुलकर्णी यांना कोटक मिहद्रा बँकेचा एम. डी. भास्करन यांच्या स्वाक्षरीचा धनादेश देतो, हा धनादेश अनामत म्हणून तुमच्याजवळ ठेवा, माल मिळाल्यानंतर तुमच्या कंपनीच्या खात्यात पूर्ण चौदा लाख सात हजार रुपये आरटीजीएसद्वारे पाठवले जातील असे सांगितले. त्यानंतर हा धनादेश रद्द करून कुरीअरद्वारे आपल्याला पाठवावा असेही म्हणाला. ठरल्यानुसार, कुलकर्णी यांनी ट्रकने २१ टन तूरडाळ चालक नवनाथ तुपे व अलीम खान यांच्याकडे सोपवली. प्रवासादरम्यान, कुमारन याने माल घेऊन तिरुचिंगोडे, पल्लीपलायम, नामाक्कल या ठिकाणी न जाता कुमारपलायम येथे येण्याचे सांगितले. हा प्रकार तुपे यांनी डाल मिलचे पवार यांना कळवला. त्यांनी अरिवदनशी बोलून खात्री केली. त्यानुसार माल संबंधित ठिकाणी उतरवला. या प्रकारानंतर पशाच्या मागणीसाठी कुलकर्णी यांनी अनेकदा भास्करन व अरिवदन यांच्याशी संपर्क साधला. मात्र, भास्करनचा मोबाइल बंद, तर आता अरिवदन संपर्क साधत नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शुक्रवारी कुलकर्णी यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.

Share: