ठाकरे सरकारची 68 गावांतील 15 हजार शेतकरी, कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर

5
0
Share:

68 गावांतील 15 हजार शेतकरी, कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर

-34 लाख 83 हजार 908 खात्यांची माहिती रजिस्टर झाली आहे. अद्याप 1 लाख 61 हजार खात्यांची माहिती येणे बाकी आहे.

मुंबई:विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने आपली वचनपूर्ती केली आहे. आमचं सरकार केवळ घोषणा करणारं नाही तर योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं सांगत कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.

कर्जमाफी झालेल्या पहिल्या यादीत राज्यातील 68 गावातील शेतकऱ्यांची नावे आहेत. सुमारे 9 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. त्या दोन हजार शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे वळते करण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची यादी पालकमंत्री यांना सुपूर्द करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. एप्रिल अखेरपर्यंत या योजनांची अमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 15 हजार 358 शेतकऱ्यांची नाव पहिल्या यादीत आहेत. लवकरच कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार आहेत.

विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार हे आपलं पहिलं बजेट सादर करणार आहेत. सरकारला तीन महिने झाले आता आम्ही त्यांना जाब विचारणार असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केलं. सर्व आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली. कामकाजाला सुरुवात होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला. तर अर्थमंत्री अजित पवार यांनी सुधारणा अध्यादेश मांडला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला तर भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

फडणवीस म्हणाले, सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये. केवळ 20 हजार जणांची यादी देणार आहे अशी फसवी घोषणा आहे. शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार सुरु आहे. रोज महिलांवर अत्याचार सुरुच आहेत. त्या संदर्भात सरकारची संवेदनशीलता दिसत नाही. आम्ही हे विषय आज सभागृहात उपस्थित करणार आहोत. महाविकास आघाडी सरकारचे नेत्यांची सर्व आमदार यांची आज महत्त्वपूर्ण बैठक

दरम्यान महाविकास आघाडीचीही महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजित पवार यासह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यात अधिवेशनाचं कामकाज आणि महाविकास आघाडी अजेंडा यावर चर्चा होणार आहे.

Share: