राज्यातील विमानतळेही बंद कऱण्यासाठी (CM Uddhav Thackeray On Corona Virus) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. तेही लवकरात लवकर बंद होतील असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

केवळ जीवनावश्यक वस्तू चालू राहतील. अन्नधान्य, औषधं, बेकरी, पशूखाद्य, पाळीव प्राणी दवाखाने सुरु राहतील. त्यासंबंधीची वाहतूक सुरु राहील. तसेच कृषी उद्योगाशी संबंधित दुकाने आणि वाहतूक सुरुच राहील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मी विनंती करुनही, सांगूनही काही जण ऐकत नाहीत ते दुर्दैवी आहे. राज्यातील सर्व मंदिरंं, प्रार्थनास्थळ बंद ठेवावी. मंदिरांमध्ये केवळ पुजारी, मौलवी असतील, असेही ते म्हणाले.

त्याशिवाय रेल्वे , बस आणि खासगी वाहनेही बंद करण्यात येणार आहे. जर आवश्यकता असेल तर चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी सर्व खासगी वाहनाला दिली आहे.

बस, खासगी वाहनेही बंद, जर आवश्यकता असेल तर चालक अधिक 2 आणि रिक्षामध्ये चालक अधिक 1 अशी परवानगी

वैद्यकीय क्षेत्रात स्टाफची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका, होमगार्ड्स यांना प्रशिक्षित करुन या सेवेसाठी तयार करणार

सध्या कोरोनाच्या निर्णयाक टप्प्यावर आलो आहे. टर्निंग पॉईंटवर आलो आहे. हीच ती वेळ आहे आता रोखू शकलो नाही तर जगभर थैमान घातलं आहे, तसंच ते महाराष्ट्रात घालेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकार आपलं आहे, आपल्यासाठी काम करतंय. काल जनतेने निश्चयाने घरात राहून जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. त्यानंतर सर्वांनी पाच वाजता टाळ्या थाळ्या, घंटा वाजवल्या. पण टाळ्या वाजवणे म्हणजे व्हायरस पळवणे नाही. तर वैद्यकीय सेवा देणारे आणि पोलिसांना अभिवादन करण्याचा तो एक भाग आहे, असेही उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray On Corona Virus) सांगितले.