ठाणे जिल्ह्यातील १८ मतदार संघातील २९ हजार ईव्हीएम मशीन तुर्भे येथील केंद्रीय वखार मंडळ गोदामात

20
0
Share:

*ठाणे जिल्ह्यातील १८ मतदार संघातील २९ हजार ईव्हीएम मशीन तुर्भे येथील केंद्रीय वखार मंडळ गोदामात

*सुरक्षेच्या दृष्टीने लावले ठाणे कलेक्टरच्या माध्यमातून ४० सीसीटीव्ही कॅमेरे*

* सर्व ईव्हीएम मशीन गोदामातून योग्य प्रकारे तपासणी व पडताळणी करून पाठवणार ठाण्यातील १८ मतदार संघात

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. नवी मुंबईत प्रचाराला चांगलेच उधाण आले आहे. जो तो उमेदवार आपले पारडे कसे जड होईल याकडे लक्ष देऊन आहे. बऱ्याच दिवसापासून सत्ताधारी व विरोधक यांच्यात निवडणूका ईव्हीएम मशीनवर घ्याव्यात की बॅलेट पेपरवर हा वाद चांगलाच रंगला होता.त्याचं ठाणे जिल्ह्यातील मतदार केंद्रातील ईव्हीएम मशीन तुर्भे येथील गोडाऊन मध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत.
येत्या २१ ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीची उत्सुकता सर्व स्तरात आहे.ठाणे जिल्ह्यात एकूण १८ मतदार संघ आहेत, या मतदार संघासाठी लागणाऱ्या २९हजार ईव्हीएम मशीन तुर्भे येथील वखार मंडळ या गोदामात कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या असून त्याचबरोबर १२ हजार बॅलेट युनिट, ८हजार कंट्रोल युनिट,१०हजार जी बी पॅट आहेत. तसेच ४० सीसीटीव्ही कॅमेरे ठाणे कलेक्टरच्या माध्यमातून लावले गेले आहेत. या सर्व ईव्हीएम मशीन संबंधित गोदामातून योग्य प्रकारे तपासणी करून १८ मतदार संघात पाठविले जाणार आहेत.

Share: