324 कर्मचार्यांना ‘कारणे दाखवा’

22
0
Share:

लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रावरील कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी आयोजित प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील तब्बल 324 कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून 48 तासांत खुलासे घेण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी प्रांताधिकार्यांना दिले आहेत. वैद्यकीय कारण देणार्या कर्मचार्यांच्या बाबतीत मेडिकल बोर्डाचे मत घेतले जाणार आहे. कारण योग्य नसल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. आजारपणाचे कारण देणार्या कर्मचार्यांवर विशेष कारवाईची तलवार लटकणार आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड लोकसभेसाठी मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी अशी प्रत्येक केंद्रावर पाच कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी 8,659 कर्मचारी व अधिकारी यांना 30 व 31 मार्च रोजी दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी व राजापूर मतदार संघात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कर्मचारी निवड करताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार करण्यात आली. मात्र, कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने निवडणूक कामात अडथळा निर्माण झाला. जिल्ह्यातील 324 कर्मचारी व अधिकारी प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिले. या सर्वांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व प्रांताधिकार्यांना दिले आहेत. गैरहजर राहणार्या कर्मचार्याला 48 तासांच्या आत गैरहजर राहण्याच्या कामाचा खुलासा करण्यास बजावले आहे. योग्य कारणाशिवाय गैरहजर राहणार्या कर्मचार्यांवर लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. गैरहजर राहणार्या कामगारांकडून येणार्या कारणांची गुणवत्तेनुसार छाननी करताना, वैद्यकीय सबब सांगणार्या अधिकारी व कर्मचार्यांबाबत मेडीकल बोर्डाचे मत घ्यावे व अहवाल सादर करावा, असे आदेशात जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. प्रांताधिकारी पातळीवरुन होणार्या कारवाईबाबतजिल्हाधिकारी स्तरावरुन फेरतपासणी केली जाणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचार्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकू लागली असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Share: