एकनाथ खडसेंनी ओबीसी समाजाला घेऊन शिवसेनेत सामील व्हावं; आम्ही त्यांचं स्वागत करू – अब्दुल सत्तार

17
0
Share:

औरंगाबाद – मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो म्हणूनच मला बाजूला करण्यात आलं मात्र नाथाभाऊ कधी संपणार नाही असं वक्तव्य भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं.

त्यावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार असे म्हणाले की,खडसे यांच्यावर भाजपमध्ये खरच अन्याय झाला आहे. त्यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये युती तुटली होती.

आता खडसेंनी आमच्याकडे यावं त्यांच्यासारख्या नेत्यांची शिवसेनेला मदत होईल. असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं. राजकारणात एखादा अपघात होतो आणि त्या अपघाताने एखादा माणूस मागे पडतो. खडसेंच भवितव्य चांगल आहे. त्यांनी शिवसेनेत ओबीसी समाजाला घेऊन सामील व्हावं. आम्ही मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या बाबत निश्चित बोलू. असं देखील अब्दुल सत्तार म्हणाले.

दरम्यान, याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील खडसे यांच्या आरोपांवर सावरासावर केली आहे. एकनाथ खडसे यांची नाराजी असेल ती चर्चाकरून दूर करू. पक्षामध्ये वेळोवेळी बदल केले जातात. गरजेनुसार निर्णय घेतले जातात, आम्ही एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करू. अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

*बाहुबली ने कटप्पाला का मारले हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे खडसे यांचा काय झालं ते नव्याने सांगायला नको.
असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांना भाजपचा बाहुबली अशी उपमा दिली. एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून आता शिवसेनेत यायला हवं आम्ही त्यांचे स्वागत करू.*

-अब्दुल सत्तार,राज्यमंत्री ,शिवसेना 

Share: