4 ते 5 लाख किमतीचे तब्बल 6 टन मासे चोरीला, महाराष्ट्रात अजब चोरीचा धक्कादायक प्रकार

5
0
Share:

नाशिकमधील येवला तालुक्यातील नायगावमध्ये
4 ते 5 लाख किमतीचे तब्बल 6 टन मासे चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आतापर्यंत सोने, चांदी आणि इतर मौल्यवान दागीने चोरीला गेल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार नायगाव येथील ग्रामपंचायतीतर्फे मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून एक वर्षाच्या कालावधीसाठी पाझर तलावाचा लिलाव करण्यात आला होता. यावेळी लिलावात प्रशांत पानपाटील यांनी पाझर तलाव 20 हजार रुपयांच्या किमतीमध्ये एक वर्षाच्या कालावधीसाठी घेतला. या तलावात त्यांनी मत्यव्यवसाय करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी तलावात रोहू, मृगळ, कटला आणि कोंबडा या जातींचे मत्स्यबीज सोडले. त्यांच्यासोबत आणखी एक भागीदार होता. त्यानेसुद्धा पानपाटील यांच्यासोबत गुंतवणूक केली होती. दोघांनी मिळून 2 लाखांचे भांडवल गुंतवले होते. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळावे म्हणून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीला चांगले फळ आले.
तलावात सोडलेल्या माशांच्या बिजामधून एक ते अर्धा किल्लो वजनाचे मासे तयार झाले. मात्र, पानपाटील एका कामानिमित्त बाहेर गेले असता काही चोरट्यांनी येऊन तळ्यातील सुमारे 5 ते 6 टन मासे रात्रीतून चोरून नेले. दरम्यान, या चोरीमुळे युवकांचे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाले आहे. ही चोरी कोणी केली असेल याचा अंदाज बांधण्यात येतोय. मात्र, अद्याप कुणाचे नाव समोर आले नाही.

 

Share: