मनरेगाची ४४ हजार कामे सुरू दुष्काळाच्या पाश्वभूमीवर

21
0
Share:

दुष्काळाच्या पाश्वभूमीवर राज्यात रोजगार हमी योजने अंतर्गत विविध उपाययोजना करण्यात आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे राज्यात ऐकून ४४ हजार ५५५ कामे सुरू आहेत त्यावर २ लाख ९६ हजार मजुरांची उपस्थिती आहे. जानेवारी अखेरीस मजुरांची संख्या ही ४० हजार ६१९ इतकी वाढली आहे. या शिवाय मजुरांना वेळेवर मजुरी देण्याचे प्रमाणही वाढले आहे. जानेवारी अखेरीस हे प्रमाण ९४% इतके होते. ही माहिती रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
मंत्री रावल म्हणाले की दुष्काळाच्या पाश्वभूमीवर मागेल त्याला तातडीने काम देण्याच्या सूचना आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहे.मनरेगा योजनेची सतत अंमलबजावणी चा आढावा सतत आम्ही घेत आहोत.केंद्रसरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी मजुरांचे ५० दिवस वाढवून दिले आहेत. जिल्ह्यांना पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जलसंधारणाच्या कामावर भर दिला जात आहे. जानेवारी अखेरीस राज्यात ५ लाख ७५ इतकी कामे शेल्फवर ठेवण्यात आली असून त्यामध्ये मजूर क्षमता १२८५.६४ लाख इतकी आहे, असे मंत्री रावल म्हणाले.

Share: