यंदाच्या लोकसभेच्या 5 वर्षाच्या, काळात लालकृष्ण अडवाणी हे किती बोलले आहे हे आपल्याला माहीत आहे का?

6
0
Share:

कधीकाळी भाजपाच्या प्रखर हिंदुत्वाचे पोस्टरबॉय मानले जाणारे लालकृष्ण आडवाणी आता मात्र फार शांत राहू लागले आहेत. भाजपा विरोधात असताना संसदेत आक्रमक भाषणं करणाऱ्या आडवाणींचा आवाज आता फारसा ऐकूही येत नाही. विरोधात असताना संसद गाजवणाऱ्या आडवाणींचा आवाज गेल्या 5 वर्षात क्षीण झाला आहे. विशेष म्हणजे या काळात भाजपाची सत्ता आहे आणि पक्षाकडे संपूर्ण बहुमत आहे. त्यामुळे ‘मार्गदर्शक मंडळातले’ आडवाणी शांत का, ते संसदेत का बोलत नाही, याची विरोधकांसह भाजपामध्येही चर्चा आहे. मात्र ही चर्चा अतिशय दबक्या आवाजात होते. आडवाणी किती कमी बोलतात, याची आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे.

पंधरावी लोकसभा (2009 ते 2014) आणि सोळावी लोकसभा (2014-19) यांचा विचार केल्यास हे अगदी स्पष्टपणे जाणवतं. गेल्या लोकसभेच्या तुलनेत संसदेतील आडवाणींचे शब्द जवळपास 99 टक्क्यांनी कमी झाले आहेत. गेल्या पाच वर्षात आडवाणी संसदेत 296 दिवस उपस्थित होते. या काळात ते 365 शब्द बोलले. कधीकाळी संसदेत धडाडणारी, सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारी भाजपाची ही तोफ आता अगदी थंड झाली आहे. ज्या पक्षासाठी जीवाचं रान केलं, तो पक्ष पूर्ण बहुमतासह सत्तेत येऊनही आडवाणींना फारसं बोलता येत नाही.

लालकृष्ण आडवाणी यांचा आक्रमक अवतार संसदेनं अनेकदा पाहिला. 8 ऑगस्ट 2012 रोजी आसाममधील घुसखोरी आणि राज्यात होणारा हिंसाचार यावर स्थगन प्रस्ताव आणण्यात आला. यावरील चर्चेवेळी संसदेत भाजपाचं नेतृत्त्व आडवाणी यांनी केलं. त्यावेळी संसदेत प्रचंड गदारोळ झाला. लोहपुरुष आडवाणींनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारला अडचणीत आणलं. साडेसहा वर्षांपूर्वी आडवाणींनी केलेल्या त्या भाषणात सत्ताधाऱ्यांनी 50 वेळा व्यत्यय आणला. मात्र भाजपाची मुलूखमैदान तोफ धडाडतच होती. त्या भाषणाचा हिशोब मांडल्यास आडवाणी 4 हजार 957 शब्द बोलले होते

Share: