महाराष्ट्र विधानसभेसाठी संध्याकाळी पर्यंत 55 टक्के मतदान,3 हजार 237 उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटीत बंद,आता निकालाची प्रतीक्षा

3
0
Share:

मुंबई:राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक दिग्गजांनी सकाळी सातच्या  ठोक्याला मतदानाा हक्क बजावला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये आज एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. येत्या 24 तारखेला (गुरुवार 24 ऑक्टोबर 2019) निवडणुकांचे निकाल हाती येतील. 3 हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत.

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?नागपुरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.98 टक्के मतदान

नागपूर : नागपूर जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.98 टक्के मतदानाची नोंद झाली आहे

21/10/2019,6:59PM

वाशिममध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.65 टक्के मतदान

वाशिम : वाशिम जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.65 टक्के मतदानाची नोदं झाली, रिसोड – 59.04% , वाशिम – 55.34% , कारंजा – 55.73%

21/10/2019,6:57PM

ठाण्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 44.50 टक्के मतदान

ठाणे : जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 44.50 टक्के मतदानाची नोंद

21/10/2019,6:55PM

येवला-लासलगावमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.73 % मतदान

लासलगाव : येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.73 % मतदान झाले

21/10/2019,6:53PM

वर्ध्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.86 % मतदान

वर्धा मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.86 टक्के मतदानाची नोंद झाली आहे, आर्वी – 61.63%, देवळी – 61.78%, हिंगणघाट – 54.8%, वर्धा – 49.25%

21/10/2019,6:51PM

हिंगोलीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 63.06 टक्के मतदान

हिंगोली : जिल्ह्यातील तीन विधानसभेची सायंकाळी 5 वाजेपर्यंतची एकूण मतदानाची टक्केवारी 63.06 इतकी आहे, वसमत – 65.70%, कळमनुरी – 65.09% ,हिंगोली- 58.06%

21/10/2019,6:48PM

सोलापुरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.55 टक्के मतदान

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास 55.55 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

21/10/2019,6:45PM

कोल्हापुरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वात जास्त 67.62 टक्के मतदान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील सर्वाधिक 67.62 टक्के मतदानाची नोंद झाली आहे

21/10/2019,6:44PM

बुलडाण्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.87 टक्के मतदान

बुलडाणा : जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.87 टक्के मतदान झालं आहे. मलकापूर – 59.20 %, बुलडाणा – 53.74 %, चिखली – 59.71 %, सिंदखेड राजा – 57.95 %, मेहकर – 56.61 %, खामगाव – 63.15 %, जळगाव-जामोद – 62.23 %

21/10/2019,6:40PM

पुण्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.55 टक्के मतदान

पुणे : पुण्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.55 टक्के मतदानाची नोंद

21/10/2019,6:28PM

साताऱ्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.99 टक्के मतदान

सातारा : जिल्ह्यात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.99 ट कक्के मतदानाची नोंद

21/10/2019,6:26PM

चंद्रपुरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.84 टक्के मतदान

चंद्रपूर : जिल्ह्यातील ६ मतदारसंघात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.84 टक्के मतदानाची नोंद, आहे राजुरा – 62.52%, चंद्रपूर – 38.19%, बल्लारपूर – 57.73% , ब्रह्मपुरी – 63.14%, चिमूर – 65.11%, वरोरा – 54.88%

21/10/2019,6:24PM

अमरावतीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.02 टक्के मतदान

अमरावती जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 56.02 टक्के मतदानाची नोंद

21/10/2019,6:20PM

परभणीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61.51 टक्के मतदान

परभणीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 61.51 टक्के मतदान

21/10/2019,6:18PM

रायगड जिल्हयात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.98 टक्के मतदान

रायगड : जिल्हयात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.98 टक्के मतदान झालं, पनवेल – 48.94 %, कर्जत – 64.13 %, उरण – 66.78 %, पेण – 62.51 %, अलिबाग – 66.28 %, श्रीवर्धन – 55.67 %, महाड – 57.18 %

21/10/2019,6:17PM

सिंधुदुर्गात 60.83 टक्के मतदान

सिंधुदुर्ग : सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सिंधुदुर्गात 60.83 टक्के मतदानाची नोंद, कणकवली – 62.59%, कुडाळ – 60.21% , सावंतवाडी – 59.63%

21/10/2019,6:14PM

मुंबईत फक्त 44 टक्के मतदान

मुंबई : शहरात सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 44 टक्के मतदान झालं आहे

21/10/2019,6:12PM

नशिकमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.54 टक्के मतदान

नाशिक : नशिकमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 54.54 टक्के मतदान, नांदगाव – 45 %, मालेगाव मध्य- 60.3%, मालेगाव बाह्य -54.22%, बागलाण – 53.73%, कळवण – 67.35%, चांदवड – 62.42%, येवला – 59.73%, सिन्नर – 60.2 %, निफाड – 63.96 %, दिंडोरी – 65.17%, नाशिक पूर्व – 40%, नाशिक मध्य – 40.66%, नाशिक पश्चिम – 48.29%, देवळाली – 47.52 %, इगतपुरी – 58.88%

राज्यात संध्याकाळी पाचपर्यंत 55 टक्के

राज्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व मतदारसंघात आज दुपारी 3 वाजेपर्यंत 43.78 टक्के इतके मतदान झाले आहे. सकाळी 7 वाजेपासून मतदानास सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत सरासरी 6.30 टक्के मतदान झाले. त्यानंतरही राज्याच्या विविध भागात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी जात आहेत. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, वाहने आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ठिकठिकाणी दिव्यांगही मोठ्या उत्साहाने मतदान करीत असल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांनीही मतदानात सहभाग घेतला. काही मतदान केंद्रांमध्ये मतदानासाठी नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून उर्वरीत मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Share: