वाशीगाव मधून 90 किलो गांजा जप्त,मास्टरमाइंड मोहम्मद इमरान सादिक अली शहा गजाआड.

20
0
Share:

नवी मुंबई: परिमंडल एकच्या विशेष पथकने वाशी गांव येथे छापा टाकून ८९ किलो २५० ग्राम गांजा जब्त केला आहे. बाजारात याची किंमत १० लाख ७६ हजार २५० रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद इमरान सादिक अली शहा (वय २३ वर्ष)  शिवाजी नगर या आरोपीला अटक केली आहे.

या बाबत परिमंडल एकचे  पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांचा मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विकणाऱ्यावर कारवाई करण्यात येत असून विशेष पथकचे सहायक पोलिस निरीक्षक जि. डी. दराडे  यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती। या माहितीप्रमाणे पोलिस पथकांनी  सापला रचला आणि तेथे इमरान शहा या आरोपीला ताब्यात घेतला. पोलिसांना त्याच्याकडून एक किलो गांजा मिळाला। अधिक तपासानंतर इमरानच्या  बोलल्यावरून वाशी गावात ॐ साईं निवास या इमारतीत खोली क्रमांक एक ८८ किलो २५० ग्राम गांजा मिळून आला. पोलिसांनी इमरानविरुद्ध एनडीपीएस अधिनियम अंतर्गत वाशी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले प्रमाणे शाह यांनी गांजा सप्लाय करण्यासाठी वाशी गावात घर भांड्यात घेतला होता त्यांनी घरमालकाला सांगितले होते टेम्पो ड्राईव्हर आहे अशे सांगून घरातून गंजची तस्करी करत होता सध्या पोलिसणीच्या मास्टरमाइंड शाहला अटक केली आहे.न्यायालयाने आरोपीला  19 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी  दिली. हा कोणाला गांजाची विक्री करणार होता, याची कसून चौकशी पोलिस करत आहेत.

Share: