कांद्याचा भाव स्थिर करण्यासाठी नाफेडमधून 90 हजार मेट्रिक टन कांदा संपूर्ण देशात; तर मुंबई Apmc मध्ये 60 टन कांद्याची आवक

नवी मुंबई: कांद्याच्या वाढत्या भावाला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारकडून  नाफेडमधून 90 हजार टन कांदा संपूर्ण देशात पाठवला आली आहे. तर आज मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये 60 टन कांदा पोहचला आहे.
आज नाफेडमधून मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या 6 गाड्यांची आवक झाली आहे. हा कांदा घाऊक बाजारात 17 ते 21 रुपये किलोने विकला जात आहे. निर्यात बंदी केल्यापासून कांद्याला मार्केटमध्ये उठाव नाही. तसेच निर्यात बंदीमुळे कांद्याचे दर स्थिर राहतील अशी प्रतिक्रिया व्यापारी महेश राऊत यांनी दिली*
*मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये पहिल्यांदाच नाफेडमधून 60 टन कांदा आला आहे. लासलगाव, व पिंपळगाव मधून 90 हजार मेट्रिक टन कांदा संपूर्ण देशात पाठवला आहे. DGFT डिपार्टमेंट सर्व निर्यातीचा कारभार बघतात. आमचा याच्याशी काही संबंध नाही अशी प्रतिक्रिया नाफेड अधिकारी अंकित प्रधान यांनी दिली.*
आज मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या 70 गाड्याची आवक झाली असून. कांद्याच्या दरात 4 रुपयांची घसरण झालेली पाहायला मिळत आहे. घाऊक बाजारात कांदा 10 ते 24 रुपये किलोने विकला जात आहे. दोन दिवसांपूर्वी 28  रुपये किलोने विकला जाणारा कांदा आज 24 रुपये किलोने विकला जात आहे.

You may have missed