मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९२.५७ % मतदान,वाशी बाजार समितीत ८७.२१%मतदान

6
0
Share:

-६ महसूल विभागात ९८.७२%, वाशी बाजार समितीत ८७.२१%मतदान

-५८ उमेद्वारांचे भवितसव्य मतपेटीत बंद झाले असून आता सोमवार २ मार्च मतमोजणी

बाजार समितीच्या आवारात  ठेवण्यात आलेल्या मतपेट्या सीसीटीव्ही आणि पोलीसच्या निगराणी खाली

नवी मुंबई:मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शनीवार दिनांक २९ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या निवडनुकीत ६ महसूल विभागात ९८.७२ % तर वाशी मार्केट मध्ये ८७.२१ % मतदान झाले असून एकूण ९२.५७ %मतदान झाले आहे.त्यामुळे आता ५८ उमेद्वारांचे भवितसव्य मतपेटीत बंद झाले असून आता सोमवार २ मार्च मतमोजणी दिवशी कोणाच्या पारड्यात मतडं झाले आहे हे स्पष्ट होणार आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहा महसुल व चार व्यापारी अशा १० मतदार संघाची निवडणूक शनीवारी पार पडली..त्यासाठी एकूण १८१ उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते . अर्ज मागे घेतल्यानंतर एकूण १८१ अर्जापैकी १२३ उमेद्वारांनी आपले अर्ज मागे घेतले असून आता ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे रहाणार होते. त्यासाठी झालेल्या निडणूकित एकूण ९३.७२ टक्के मतदान झाले आहे.त्यातील सहा महसूल विभातात एकूण ३९२८ मतदार पैकी ३८७८ मतदारांनी मतदान केले.

याठिकाणी ९८.७२ % मतदान झाले.तर वाशी मार्केट मध्ये एकूण ४५०७ मतदारांपैकी ३९३१ मतदारांनी मतदान केले.याठिकाणी ८७.२१ % मतदान झाले. तर राज्यात एकूण ८४३५ मतदारांपैकी ७८०९ मतदारांनी मतदान केले.व राज्यात एकंदरीत ९२.५७%मतदान झाले.अतिशय शांततेत पार पडलेल्या निवडणुकीत भाजी पाला आणि कांदा बटाटा मार्केट मध्ये अतिशय चुरस होति असे दिसून आले.तर या याची मतमोजणी सोमवार २ मार्च रोजी कांदा बटाटा मार्केट आवारात होणार असून कोणाच्या पारड्यात मतदारांनी मतांचे दान टाकले आहे याचे चित्र सोमवारी दुपार पर्यंत स्पष्ट होईल.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महाआघाडीचा प्रयोग आजमावला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप व शिवसेना यांनी आपले पॅनल बनविले आहे व भाजपही या निवडणुकीत सहभागी होत आहे.मात्र पाचही बाजारातील व्यापारी प्रतिनिधी कोणत्याही पॅनल मध्ये सहभागी झाले नसल्याने दिसून येत आहे.फळबाजार मधील निवडणूक मात्र बिनविरोध पार पडली असून संजय पानसरे यांना कौल देण्यात आलेला आहे.
कांदा बटाटा बाजारात पूर्व संचालक अशोक वाळुंज व कांदा बटाटा अडत व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र शेळके यांच्यात चुरशीची लढत आहे.भाजीपाला बाजारात चार उमेदवार उभे असून, माजी संचालक शंकर पिंगळें व के डी मोरे यांच्यात चुरशीची लढत आहे.तर मसाला बाजारात माजी संचालक कीर्ती राणा व अशोक राणावत यांच्यात चुरस आहे.तसेच दाना मार्केट मध्ये पोपटलाल भंडारी व निलेश वीरा यांच्यात चुरशीची लढत आहे .संचालक मंडळाच्या या निवडणुकीसाठी नवी मुंबईत 100 पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या वरोबर क्राइम ब्रांचचे तीन युनिट पूर्ण तैनात करण्यात आला होता।

Share: