लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लूटणारी टोळी जेरबंद

24
0
Share:

नवी मुंबई:लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारी सराईत टोळीतील चौघांना रबाळे पोलीसांनी अटक केले आहे.
रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात जिग्नेश शहा यांनी दिलेल्या तक्रारीवरून एकोणीस तारखेला 392 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

18 तारखेला शहा हे त्यांच्या कामावरून डोंबिवली येथे त्यांच्या घरी जाण्यासाठी रात्री 12 ते साडेबारा च्या सुमारास घनसोली रेल्वे स्टेशन समोरील ठाणे बेलापूर रोड लगत असलेल्या सर्विस रोडवर शेअर टॅक्सीने प्रवास करण्यासाठी आले होते. त्याठिकाणी एका सफेद रंगाच्या मारुती इको गाडीमध्ये चालक व तीन प्रवासी बसलेले त्यांनी पाहिले. संबंधित चालक महापे शीळ रस्ताने जात असताना महापे परिसरात गाडीतील मागील सीटवर बसलेले सहप्रवासी यांनी इतर दोन पुढे बसलेले त्यांचे साथीदार यांच्या सोबत संगणमत करून शहा यांना पिस्तोलचा धाक दाखवून त्यांच्या पाकिटातील 1000 रुपये रोख रक्कम तसेच आयसीआयसीआय एक्सिस, एचडीएफसी बँकेचे एटीएम कार्ड तसेच त्यांचा मोबाईल फोन जबरस्तीने धाक दाखवून काढून घेतला व त्या सहप्रवासी असणाऱ्या चारही आरोपींनी म्हापे व तुर्भे परिसरात फिरवून व धकावून तिन्ही ए टी एम कार्डचे पिन नंबर मागितले व तुर्भे एम आय डी सी परिसरातील ए टी एम मध्ये जाऊन, शहा यांच्या कार्डद्वारे 36000 रुपयांची रोख रक्कम काढली व शहा यांना म्हापे परिसरात शीळ फाटा रोडवर सोडून दिले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रबाळे एम आय डी सी पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्यांतील घटनास्थळी व एम आय डी सी परिसरात तपास सुरू केला तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींची पडताळणी केली. पोलिसांनी वेळोवेळी घणसोली रेल्वे हे स्थानक समोरील सर्विस रोडवर सापळे लावले दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी याच आरोपींना पोलिसांनी मारुती इको या गाडीसह ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी लोखंडी धातूचे काळ्या रंगाचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, एक चाकू ही हत्यारे त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली प्राथमिक तपासात त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना29 फेब्रुवारी पर्यत कोठडी मंजूर केली आहे.संबधित चारही आरोपी हे सराईत असल्याचे निष्पन्न झाले असून, यातील मुख्य आरोपीच्या विरोधात 2014 ला नाशिक येथे दरोड्यांत सहभागी असल्याचा व इतर एका आरोपी विरुद्ध धुळे येथे रिक्षा चोरीचा गुन्हा दाखल आहे, तसेच तपासात त्यांच्याकडे असलेली मारोती इको तसेच काळ्या रंगाचा इको गाडी घणसोली परिसरातून त्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Share: