वाशी सत्रा प्लाझा येथील बारमध्ये अनधिकृत पणे हुक्का पार्लर चालवणाऱ्यावर कारवाई

26
0
Share:

नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखा पथकाने शनिवारी रात्री वाशी येथील सत्रा प्लाझा या इमारतीत कॅफे पाम अटलांटिस या बार वर धाड टाकत कारवाई करण्यात आलेय. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केला आहे.

सदर बार मध्ये अनधिकृत हुक्का पार्लर चा व्यवसाय सुरू होता. पोलिसांनी धाड टाकल्यासमयी बार मध्ये जंगी हुक्का पार्टी सुरू होती. तर या पार्टी मध्ये तब्बल 211 जणांचा सहभाग होता यामध्ये 54 तरुणी तर 157 तरुणांचा सहभाग होता.

राज्यात फक्त 50% क्षमतेने बार व रेस्टॉरंट चालवण्यास परवानगी आहे त्यात हुक्का पार्लर वर पूर्णतः बंदी असताना देखील अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवत हुक्का पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई गुन्हे शाखे तर्फे बार वर अनधिकृत पणे हुक्का पार्लर चालवणे, क्षमतेपेक्षा जास्त गर्दी जमवणे, पॅडेंमिक ऍक्ट चे उल्लंघन करणे या कलमां प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. मागील दीड महिन्यात या बार वरील ही पाचवी कारवाई असून देखील बार मालक अनधिकृत पणे सर्रास हुक्का पार्लर चालवत आहे.

कारवाईचे सत्र

सत्रा प्लाझा या व्यावसायिक इमारतीमध्ये पोलिसांनी मागील वर्षभरामध्ये अनेक मसाज पार्लरवर कारवाई केली आहे. या मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली अनैतिक धंदे सुरू असल्याचे पोलिसांनी या ठिकाणी छापे मारल्यानंतर उघडकीस आले आहे. त्या पाठोपाठ पोलिसांनी याच इमारतीत बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा मारून ते बंद करण्याची कारवाई केली. त्याशिवाय याच इमारतीमधील पब, बार रेस्टॉरण्टमधून गैरप्रकार होत असल्याचे बोलले जात आहे.

Share: