ब्लुस्टार बारवर कारवाई; 40 बारबालां सह पांच जणांना अटक

23
0
Share:

ब्लुस्टार बारवर कारवाई; 40 बारबालां सह पांच जणांना अटक

तुर्भे परिसरातील ब्लुस्टार बारवरील कारवाई एपीएमसी पोलीस व क्राइम ब्रँच सेंट्रल युनिट अधिकार्‍यांनी 45 जणांना अटक केली. असून त्यात बारच्या मॅनेजरसह इतर कर्मचारी आणि 40 बारबालांचा समावेश आहे. पोस्को ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पुढील तपास एपीएमसी पोलिस करत आहेत
-शहरात काही बारमध्ये डान्स परवाना नाही, तरी सुद्धा या बारमध्ये डान्स बार सुरु असल्याच्या काही तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. तुर्भे येथील माफ़कॉ लागत असलेल्या ब्लुस्टार नावाचे एक बार अ‍ॅण्ड रेस्ट्रॉरंट असून या बारमध्ये डान्स परवाना नसतानाही तिथे रात्री उशिरापर्यंत बारबालांना कामावर ठेवून त्यांना तिथे येणार्‍या गिर्‍हाईकांसोबत अश्‍लील चाळे करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती एपीएमसी पोलीस व क्राइम ब्रँच सेंट्रल युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीनंतर या पथकाने बुधबारी रात्री उशिरा ब्लुस्टार बारवर कारवाई केली . या कारवाईत पोलिसांनी 5 पुरुष आणि 40 महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या सर्वांना नंतर एपीएमसी पोलिस ठाण्यात आणले असून . 45 जणांना पोलिसांनी विविध भादवी कलमांतर्गत अटक केली या मधील काही अल्पवयीन मुली आढळून आल्या असून पोस्को ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे , त्यात ,बारचा मॅनेजर, कॅशिअर, वेटर, ग्राहक आणि बारबालांचा समावेश होता. बारचा मालक फरार असून एपीएमसी पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत

Share: